HDFC Bank: देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. बँकेच्या काही कस्टमर केअर सेवा दोन दिवस ठप्प राहणार आहेत. या कालावधीत WhatsApp व SMS चॅट बँकिंगसह काही सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
कोणत्या दिवशी सेवा बंद राहणार?
इकोनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्टच्या रात्री 11 वाजल्यापासून ते 23 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे सात तास बँकेच्या काही सेवा बंद राहतील. त्यामुळे या काळात ग्राहकांना गैरसोय होऊ शकते. आवश्यक व्यवहार आगाऊ करून ठेवणे हितावह ठरेल.
या सेवा ठप्प राहणार
- फोन बँकिंग IVR
- ई-मेल व सोशल मीडिया सपोर्ट
- WhatsApp वर चॅट बँकिंग
- SMS बँकिंग
या सेवा सुरू राहणार
जरी काही सेवा उपलब्ध नसल्या तरी ग्राहकांना खालील सुविधा मिळत राहतील:
- फोन बँकिंग एजंट सर्व्हिसेस
- HDFC नेटबँकिंग
- एचडीएफसी मोबाइल बँकिंग
- PayZapp
- MyCards
सेवा का होणार बंद?
बँकेच्या माहितीनुसार, हा मेंटेनन्स वर्क आहे. ग्राहकांचा बँकिंग अनुभव अधिक सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला जात आहे. अशा प्रकारचे देखभाल काम बँकिंग क्षेत्रात नेहमीच केले जाते. या कालावधीत ग्राहकांनी आपल्या गरजेप्रमाणे आवश्यक तयारी आधीच करून ठेवणे गरजेचे आहे.









