स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. HONOR चा नवा HONOR X7c 5G स्मार्टफोन भारतात लॉन्चसाठी सज्ज आहे. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की हा फोन 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बाजारात उतरणार आहे. Amazon वर याची microsite आधीच लाईव्ह आहे, म्हणजेच हा फोन लॉन्चनंतर Amazon आणि HONOR च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. ग्राहकांसाठी हा फोन Forest Green आणि Moonlight White या दोन रंगांमध्ये येईल.
तुटणार नाही, पाण्यात बुडालं तरी चालणार
HONOR X7c 5G ला कंपनीने 5-स्टार ड्रॉप रेजिस्टंट रेटिंग दिली आहे. म्हणजे फोन चुकून खाली पडला तरी तुटणार नाही. याशिवाय, या फोनला IP64 वॉटरप्रूफ रेटिंग मिळालं आहे आणि तो 3 मिनिटांचा वॉशिंग टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे फोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तरी तो खराब होणार नाही.
दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
फोनमध्ये 5200mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 35W सुपरचार्ज सपोर्टसह येते. कंपनीच्या मते, यातून 24 तास ऑनलाइन स्ट्रीमिंग, 18 तास शॉर्ट व्हिडिओ, 59 तास म्युझिक प्लेबॅक आणि 46 तास कॉलिंग टाइम मिळेल. विशेष म्हणजे, Ultra Power Saving Mode मध्ये फक्त 2% बॅटरी असतानाही 75 मिनिट कॉलिंग करता येईल.
डिस्प्ले आणि कॅमेऱ्याचं खास पॅकेज
HONOR X7c 5G मध्ये 6.8-इंच Full HD+ डिस्प्ले आहे, ज्याला 120Hz रिफ्रेश रेट आणि 850 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP मुख्य कॅमेरा दिला आहे. परफॉर्मन्ससाठी यात Snapdragon 4 Gen 2 चिपसेट असून 8GB स्टॅंडर्ड + 8GB व्हर्च्युअल अशा एकूण 16GB RAM आणि 256GB स्टोरेजचा पर्याय दिला आहे. दमदार साउंडसाठी ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स मिळतात आणि यात अनेक AI फीचर्सचाही समावेश आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती कंपनीच्या अधिकृत घोषणांवर आधारित आहे. खरेदी करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्या.














