फक्त ₹8.25 लाखात मिळणाऱ्या SUVने टाटा-महिंद्राची झोप उडवली, जबरदस्त विक्रीने सर्वांनाच चकित केलं!

स्कोडा काइलॅक SUV ने भारतात दमदार एंट्री घेतली असून विक्रीत दुप्पट वाढ केली आहे. ही SUV आता टॉप 7 ब्रँड्समध्ये सामील झाली असून किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

On:
Follow Us

Skoda kylaq: स्कोडा काइलॅक ही SUV भारतात केवळ काही महिन्यांपूर्वी लाँच झाली असून, तिने अल्पावधीत जबरदस्त यश मिळवलं आहे. या गाडीने 10 लाख रुपयांच्या खालील SUV सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि हुंडईसारख्या दिग्गज कंपन्यांच्या झोपा उडवल्या आहेत. इतकंच नव्हे तर या एका कारच्या जोरावर स्कोडा इंडियाची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

सबकॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये काइलॅकची मजबूत पकड

भारतात सबकॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये वाढती मागणी असताना, स्कोडा काइलॅकने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच झालेली ही SUV अल्पावधीतच बेस्ट सेलिंग मॉडेल्समध्ये सामील झाली आहे. जून 2025 मध्ये स्कोडाने एकूण 5,014 युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षी जूनमध्ये झालेल्या 2,566 युनिट्सच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. कंपनीने या वृद्धीचे श्रेय काइलॅक SUV ला दिले आहे, जी सध्या मार्केटमध्ये प्रचंड डिमांडमध्ये आहे.

2025 च्या पहिल्या सहामाहीत स्कोडाची कमाल कामगिरी

काइलॅकच्या यशामुळेच 2025 च्या पहिल्या 6 महिन्यांत स्कोडासाठी विक्रमी कामगिरी झाली आहे. जानेवारी ते जूनदरम्यान कंपनीने 36,194 युनिट्सची थोक विक्री केली असून, ही संख्या 2024 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 134 टक्क्यांनी अधिक आहे. या मजबूत आकड्यांमुळे स्कोडा इंडियाला भारतीय ऑटो इंडस्ट्रीच्या रँकिंगमध्ये 4 पायऱ्यांनी वर जाण्यास मदत झाली आहे. यामुळेच स्कोडा प्रथमच भारतातील टॉप 7 कार ब्रँड्समध्ये सामील झाली आहे. विशेष म्हणजे, काइलॅकने टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्येही चांगली पकड बनवली आहे.

स्कोडा काइलॅकची किंमत किती आहे?

दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार स्कोडा काइलॅकची सुरुवातीची किंमत 8.25 लाख रुपये असून, टॉप वेरिएंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे. ही स्कोडाची पहिली सबकॉम्पॅक्ट SUV असून ती या सेगमेंटमधील सर्वाधिक डिमांड असणाऱ्या गाड्यांमध्ये गणली जाते. काइलॅकमध्ये स्कोडाचा सिग्नेचर डिझाइन आणि भरपूर फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

स्कोडा काइलॅकचे फीचर्स काय आहेत?

ही SUV चार वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे — क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज. सेफ्टीसाठी यामध्ये 6 एअरबॅग्स, ABS सह EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आले आहे. सोबतच, टिल्ट-टेलिस्कोपिक स्टीयरिंग, सीट हाइट अॅडजस्टमेंट, पावर्ड मिरर, मॅन्युअल एसी हेही फीचर्स आहेत. एक्स्टेरियरमध्ये LED हेडलाइट्स-टेललाइट्स, ORVM टर्न इंडिकेटर्स आणि 16-इंच स्टील व्हील्स (व्हील कव्हरसोबत) यांचा समावेश आहे.


Disclaimer: वरील माहिती ही विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. गाडी खरेदी करण्यापूर्वी अधिकृत डीलरकडून सर्व माहिती तपासून घ्या.

Vinod Kamble

My Name is Vinod Kamble, I Work as a Content Writer for MarathiGold and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel