7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह OnePlus Nord 5 स्मार्टफोन लवकरच येतोय, जाणून घ्या किंमत

7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9400e प्रोसेसरसह येणारा OnePlus Nord 5 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असून त्याची किंमत ₹30,000 च्या आसपास असू शकते.

On:
Follow Us

टेक कंपनी OnePlus भारतात आपला पुढचा मिड-फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus Nord 5 लाँच करण्याच्या तयारीत आहे. अद्याप कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी अनेक लीक आणि रिपोर्ट्समधून या डिव्हाइससंदर्भातील महत्त्वाच्या तपशीलांची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये याचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील समाविष्ट आहे.

OnePlus Nord 5 हा मागच्या वर्षी जुलैमध्ये लाँच झालेल्या OnePlus Nord 4 चा उत्तराधिकारी असणार आहे. चला तर पाहूया, OnePlus Nord 5 बद्दल सविस्तर माहिती:

OnePlus Nord 5 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स (Leak)

लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 5 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह फ्लॅट OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या स्क्रीनमध्ये 1.5K रिझोल्यूशन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 9400e प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे, जो Dimensity 9400 चा थोडा टोन-डाउन व्हर्जन आहे.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर, OnePlus Nord 5 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यामध्ये OIS सह 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स असू शकतो. सेल्फी (Selfie) आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाऊ शकतो.

या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची बॅटरी (Battery). कारण OnePlus Nord 5 मध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 100W Fast Charging ला सपोर्ट करेल. इतर फीचर्समध्ये ड्युअल स्पीकर, एक IR Blaster आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश असू शकतो. डिझाईनच्या बाबतीत, या फोनमध्ये ग्लास बॅक आणि प्लास्टिक फ्रेम असलेली बॉडी असण्याची शक्यता आहे.

OnePlus Nord 5 किंमत आणि लॉन्च टाइमलाइन (Leak)

लीक्सनुसार, OnePlus Nord 5 ची भारतातील किंमत सुमारे ₹30,000 च्या आसपास असू शकते. तसेच या स्मार्टफोनचा लाँच जून आणि जुलै महिन्यांदरम्यान कधीही होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel