Xiaomi India ने अखेर भारतात तयार करण्यात आलेली त्यांची पहिली स्मार्टवॉच – Redmi Watch Move सादर केली आहे. ही वॉच फिटनेस, हेल्थ मॉनिटरिंग आणि स्मार्ट कनेक्टिविटी या तिन्ही गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते. त्यामुळे वापरकर्त्यांना एक परिपूर्ण wearable experience मिळतो. यामध्ये अनेक स्मार्ट आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले असून तिची किंमत ₹2000 पेक्षा देखील कमी आहे.
Redmi Watch Move मध्ये 140 पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स (Workout Modes) आहेत आणि सुमारे 98.5% पर्यंत अचूक ट्रॅकिंग (Tracking Accuracy) मिळते. मग ते रनिंग (Running) असो, जिम असो की योगा, ही स्मार्टवॉच प्रत्येक हालचालीचं अचूक निरीक्षण करते आणि रिअल टाइम फीडबॅक (Real-Time Feedback) देते. त्यामुळे वापरकर्त्यांचा फिटनेस प्रवास अधिक प्रभावी होतो आणि ते त्यांच्या आरोग्याकडे योग्य प्रकारे लक्ष देऊ शकतात.
हेल्थ ट्रॅकिंगसाठी प्रगत फीचर्स
या वॉचमध्ये हार्ट रेट (Heart Rate), SpO2, स्ट्रेस लेव्हल (Stress Level) आणि स्लीप सायकल (Sleep Cycle) यासह (REM झोपेचा समावेश) विविध आरोग्यविषयक बाबी ट्रॅक करण्याची सुविधा आहे. महिलांसाठी यामध्ये मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकिंग (Menstrual Cycle Tracking) चा पर्यायही दिला आहे. हार्डवेअरच्या बाबतीत पाहिल्यास, यामध्ये 1.85 इंचांची AMOLED स्क्रीन असून ती 600nits पर्यंत ब्राईटनेस देते.
Redmi Watch Move मध्ये 2.5D कर्व्ड ग्लास (Curved Glass), Always-On Display, आणि anti-allergic, anti-bacterial TPU स्ट्रॅप देण्यात आला आहे, जो दिवसभर घालण्यासाठी अतिशय आरामदायक आहे. वॉचमध्ये IP68 रेटिंग असून ती Xiaomi HyperOS वर चालते, त्यामुळे यामध्ये नोट्स, टास्क्स, कॅलेंडर आणि हवामान यासारखी माहिती Sync होते.
नेव्हिगेशनसाठी यामध्ये फंक्शनल रोटेटिंग क्राउन (Functional Rotating Crown) देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये Bluetooth कॉलिंग, नोटिफिकेशन मॅनेजमेंट, आणि हिंदी भाषा सपोर्ट मिळतो. वॉचमध्ये 14 दिवसांपर्यंत टिकणारी बॅटरी आहे आणि Always-On Display वापरूनही ती 5 दिवसांचा बॅकअप देते. वापरकर्ते यामध्ये Ultra Battery Saver Mode वापरून आणखी जास्त बॅटरी मिळवू शकतात.
इतकी आहे Redmi Watch Move ची किंमत
Redmi Watch Move ची किंमत ₹1,999 ठेवण्यात आली असून ती 1 मे 2025 पासून Mi.com, Flipkart आणि Xiaomi च्या अधिकृत रिटेल स्टोअर्स वर उपलब्ध होणार आहे. ही स्मार्टवॉच चार आकर्षक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे – Black Drift, Blue Blaze, Silver Sprint, आणि Gold Rush. यासाठी प्री-बुकिंग 24 एप्रिलपासून सुरू होईल.