भारतीय बाजारात Infinix ने आज आपल्या ‘Note’ सिरीजचा विस्तार करत नवीन Infinix Note 50s 5G+ स्मार्टफोन लाँच केला आहे. हा 5G फोन खास Scent-Tech फीचरसह सादर करण्यात आला असून, त्यातून सुगंध देखील येतो. Infinix Note 50s हा कमी किंमतीतील फोन असून यामध्ये 144Hz 3D curved AMOLED स्क्रीन, 16GB RAM (8GB+8GB), Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर, 64MP कॅमेरा आणि 5,500mAh बॅटरी यांसारख्या दमदार फीचर्सचा समावेश आहे.
Infinix Note 50s 5G+ ची किंमत
Infinix Note 50s 5G+ हा मोबाईल भारतात 8GB RAM वर्जनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 128GB स्टोरेजसाठी ₹15,999 तर 256GB स्टोरेजसाठी ₹17,999 ठेवण्यात आली आहे. हा Infinix मोबाईल 25 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, याचे Marine Drift Blue, Titanium Grey आणि Burgundy Red हे विगन लेदर फिनिश असलेले रंग पर्याय देण्यात आले आहेत. प्रारंभिक विक्रीदरम्यान कंपनी ₹1,000 चा डिस्काउंट देखील देणार आहे.
Infinix Note 50s 5G+ चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 2436 × 1080 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा FullHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही 3D कर्व्ह्ड AMOLED स्क्रीन आहे ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 1300nits पीक ब्राइटनेस आणि 2160Hz PWM Dimming सपोर्ट मिळतो. फोनमध्ये In-display fingerprint sensor देण्यात आला आहे आणि स्क्रीनवर Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा देखील दिली आहे.
परफॉर्मन्स: Infinix Note 50s 5G+ हा स्मार्टफोन Android 15 वर चालतो आणि XOS 15 युजर इंटरफेससह सादर झाला आहे. या फोनमध्ये 4nm फॅब्रिकेशनवर तयार केलेला MediaTek Dimensity 7300 Ultimate Octa-core प्रोसेसर दिला आहे. मोबाईल गेमिंगसाठी यात MediaTek HyperEngine, NPU 665, आणि Mali-G615 GPU देण्यात आले आहेत, ज्यामुळे FreeFire Max आणि COD Mobile सारखे गेम्स 90fps वर प्ले करता येतात.
मेमरी: भारतीय बाजारात हा Infinix 5G स्मार्टफोन 8GB LPDDR5x RAM सह लॉन्च झाला आहे. यात 8GB Extended RAM Technology देण्यात आली आहे, ज्यामुळे एकूण RAM क्षमता 16GB (8GB+8GB) होते. फोनमध्ये 128GB आणि 256GB च्या इंटरनल स्टोरेज ऑप्शन्स दिले आहेत.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Infinix Note 50s 5G+ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 64MP Sony IMX682 सेंसर (10X Digital Zoom क्षमतेसह आणि LED फ्लॅशसह) आणि 2MP सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये दमदार 5,500mAh बॅटरी दिली आहे. हिला जलद चार्जिंगसाठी 45W All-round FastCharge 3.0 तंत्रज्ञानाचा सपोर्ट आहे. कंपनीच्या मते, ही बॅटरी फक्त 60 मिनिटांत 1% वरून 100% पर्यंत पूर्ण चार्ज होते.
अन्य फीचर्स: हा Infinix 5G स्मार्टफोन Microencapsulation Technology (मायक्रोएनकॅप्सुलेशन टेक्नोलॉजी) सह येतो, ज्यामुळे Marine Drift Blue रंगाच्या मॉडेलच्या बॅक पॅनलमधून सुगंध येतो. फोनला मजबुतीसाठी MIL-STD-810H Military Certification देण्यात आले आहे आणि IP64 रेटिंगद्वारे पाण्यापासून संरक्षण दिले आहे. यात JBL स्पीकर्स देण्यात आले आहेत.