OnePlus 13T स्मार्टफोनची (OnePlus 13T) प्रतीक्षा करणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी अपडेट आहे. कंपनी हा प्रीमियम फोन चीनमध्ये 24 एप्रिल रोजी लॉन्च करणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या डिव्हाईसबाबत अनेक लीक रिपोर्ट्स समोर आल्या आहेत, ज्यात त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी या फोनचा हँड्स-ऑन व्हिडिओ देखील लीक झाला होता, ज्यामध्ये डिव्हाइसचा डिझाइन समोर आला होता. आता लॉन्चला काहीच दिवस उरले असताना, नवीन लीकने युजर्सचा उत्साह आणखीनच वाढवला आहे.
नवीन लीकनुसार, OnePlus 13T मध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादव यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली आहे की, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony मेन कॅमेरा दिला जाईल. याशिवाय, यात 50 मेगापिक्सलचा 2x टेलीफोटो लेन्स देखील असणार आहे, जो वापरकर्त्यांना प्रोफेशनल फोटोग्राफीचा अनुभव देईल.
खास फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स (Specifications) अशी असू शकतात
लीक रिपोर्टनुसार, OnePlus 13T मध्ये 6.3-इंचाचा 1.5K फ्लॅट OLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात येऊ शकतो. फोनमध्ये LPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
सेल्फीसाठी (Selfie), या डिव्हाईसला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये 6100mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल, असं लीकमध्ये सांगितलं जातंय.
डिझाइनबाबत बोलायचं झालं, तर हा फोन मेटल फ्रेमसह येऊ शकतो. हॅप्टिक फीडबॅकसाठी X-axis Linear Motor देखील यात दिला जाऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टमबाबत (OS) विचार केल्यास, OnePlus 13T मध्ये Android 15 वर आधारित सॉफ्टवेअर दिलं जाईल.
कनेक्टिव्हिटीसाठी (Connectivity), या फोनमध्ये Wi-Fi 7, Wi-Fi 6, Wi-Fi 5, Bluetooth 5.4, आणि NFC सपोर्ट असण्याची शक्यता आहे. कंपनी अलर्ट स्लायडरची जागा Action Button ने घेऊ शकते. हा फोन IP68/69 रेटिंगसह वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असेल.
तसंच, यामध्ये IR Blaster देखील दिलं जाऊ शकतं, ज्यामुळे फोनला रिमोट कंट्रोलप्रमाणे वापरता येईल. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल – Morning Mist Grey, Heart Beating Pink, आणि Cloud Ink Black.