सर्वात मोठी बॅटरी, मोठी स्क्रीन, JBL स्पीकर आणि Stylusसह नवीन Moto Pad 60 PRO लॉन्च

Motorola ने भारतात आपला पॉवरफुल Moto Pad 60 PRO लाँच केला आहे, ज्यामध्ये 12.7-इंच स्क्रीन, JBL स्पीकर, 10200mAh बॅटरी आणि 12GB RAM मिळते. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स.

On:
Follow Us

चिनी स्मार्टफोन ब्रँड Motorola ने भारतात आपला पॉवरफुल टॅबलेट Moto Pad 60 PRO लॉन्च केला आहे. हा टॅब मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला असून यामध्ये 12 इंचांहून मोठी स्क्रीन आणि 10,000mAh पेक्षा जास्त बॅटरी दिली गेली आहे.

यासोबत 12GB पर्यंत RAM देण्यात आली आहे, जी यूझर्सना मल्टी-टास्किंग करताना अधिक चांगला परफॉर्मन्स देईल. ऑडिओसाठी यामध्ये Dolby Atmos तंत्रज्ञानासह Quad JBL स्पीकर दिले गेले आहेत. चला जाणून घेऊया Moto Pad 60 PRO ची किंमत, फर्स्ट सेल आणि त्याचे संपूर्ण फीचर्स.

Moto Pad 60 PRO ची किंमत

Moto Pad 60 PRO दोन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत ₹26,999 असून 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹28,999 आहे. हा टॅबलेट Pantone Bronze Green रंगात लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्च ऑफरसह यावर ₹2,000 ची बँक सूट सुद्धा मिळू शकते.

Moto Pad 60 PRO चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Pad 60 PRO मध्ये 3K रिझोल्यूशन असलेली 12.7-इंच LCD स्क्रीन, 144Hz Refresh Rate, Octa-Core 4nm Dimensity 8300 प्रोसेसर, आणि 12GB पर्यंत RAM मिळते.

टॅबमध्ये Quad JBL स्पीकर सिस्टम, Dolby Atmos सपोर्ट आणि 45W फास्ट चार्जिंगसह 10,200mAh ची बॅटरी दिली आहे. या टॅबसोबत येणाऱ्या Moto Pen Pro Stylus मध्ये Ultra-low Latency, 4096 Pressure Levels, Tilt Detection, Palm Rejection, आणि 35 तासांपर्यंत वापरता येण्याची क्षमता दिली गेली आहे.

हा टॅबलेट Android 14 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर चालतो आणि यामध्ये Smart Connect फीचर्स देखील देण्यात आले आहेत. डिव्हाइसमध्ये 13MP रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

हा टॅबलेट MediaTek Dimensity 8300 प्रोसेसर आणि Integrated ARM G615 MC5 Graphics सह सादर करण्यात आला आहे. 8GB रॅम व्हेरिएंटमध्ये UFS 3.1 स्टोरेज दिले आहे, तर 12GB व्हेरिएंटमध्ये फास्ट UFS 4.0 स्टोरेज आहे. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 1TB पर्यंत MicroSD कार्डचा सपोर्ट दिला गेला आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel