200MP कॅमेरा असलेला Honor 5G स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च! स्टायलिश लुकसोबत दमदार फीचर्स

Honor लवकरच 200MP कॅमेरा, Snapdragon प्रोसेसर, आणि दमदार बॅटरीसह दोन नवे 5G स्मार्टफोन Honor 400 आणि Honor 400 Pro लॉन्च करणार आहे. जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

On:
Follow Us

Honor ने अलीकडेच ग्लोबल मार्केटमध्ये आपला नवा 5G स्मार्टफोन Honor 400 Lite लॉन्च केला आहे, जो आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. याच सीरिजचा विस्तार करत कंपनी लवकरच आणखी दोन नव्या मोबाईल्स Honor 400 आणि Honor 400 Pro बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही ऑनर स्मार्टफोन्सच्या रेंडर इमेज आणि स्पेसिफिकेशन्स (Specifications) समोर आले आहेत, जे पुढे पाहता येतील.

Honor 400 आणि 400 Pro चे कॅमेरा फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही 5G फोन 200 मेगापिक्सल कॅमेरा (200MP Camera) सपोर्ट करतील. Honor 400 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा तर Honor 400 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो. दोन्ही फोनमध्ये 200MP OIS सेन्सर दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या 5G स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Honor 400 च्या बॅक पॅनलवर 12 मेगापिक्सल ultra-wide angle lens दिला जाईल, तर Honor 400 Pro मध्ये 50MP telephoto lens आणि 12MP ultra-wide lens असलेलं ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं जाईल.

Honor 400 स्पेसिफिकेशन्स (लीक)

डिस्प्ले (Display) : Honor 400 मध्ये 6.55-इंच AMOLED स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे, जी 120Hz refresh rate आणि 5000nits peak brightness सपोर्ट करेल. यात in-display fingerprint sensor technology दिली जाईल.

परफॉर्मन्स (Performance) : हा फोन Android 15 आधारित MagicOS 9.0 वर चालू शकतो. प्रोसेसिंगसाठी यात Qualcomm Snapdragon 7 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 2.63GHz clock speed पर्यंत काम करू शकतो.

बॅटरी (Battery) : Honor 400 मध्ये 5,300mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली जाऊ शकते. या मोठ्या बॅटरीसाठी 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

इतर फीचर्स (Other Features) : लीक रिपोर्ट्सनुसार हा फोन AI features, Bluetooth, WiFi आणि NFC सपोर्टसह सादर होईल. याची जाडी 7.3mm आणि वजन 184g असेल. हा फोन IP65 रेटिंगसह येण्याची शक्यता आहे.

Honor 400 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

डिस्प्ले (Display) : Honor 400 Pro मध्ये 6.8-इंच AMOLED पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120Hz refresh rate, 5000nits peak brightness आणि in-display fingerprint sensor असेल.

परफॉर्मन्स (Performance) : हा 5G स्मार्टफोन Android 15 आधारित MagicOS 9.0 वर काम करेल. प्रोसेसर म्हणून Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ऑक्टा-कोर चिप दिली जाऊ शकते, जी 3.4GHz clock speed पर्यंत कार्य करू शकते.

बॅटरी (Battery) : Honor 400 Pro मध्येही 5,300mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येऊ शकते, जी 15 मिनिटांत 50% चार्ज करू शकते.

इतर फीचर्स (Other Features) : Honor 400 Pro मध्येही AI features, Bluetooth, WiFi आणि NFC यांचा समावेश असेल. याची जाडी 8.1mm आणि वजन 205g असेल. हा फोन IP68 + IP69 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो.

Honor 400 आणि 400 Pro चा डिझाइन

Honor 400 मध्ये flat panel punch-hole डिस्प्ले दिला आहे, तर Honor 400 Pro मध्ये quad-curved पॅनल आहे, ज्यामध्ये pill-shape punch-hole डिस्प्ले दिला गेला आहे. लीकनुसार, बेस मॉडेल gold आणि black कलरमध्ये तर प्रो मॉडेल grey आणि black शेडमध्ये येईल.

Honor 400 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा, तर Honor 400 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. प्रो मॉडेलच्या रियर पॅनलवर ‘200MP AI Camera’ लिहिलं आहे. स्मार्टफोन्सच्या उजव्या बाजूला volume rocker आणि power button असून, SIM ट्रे आणि USB पोर्ट हे लोअर फ्रेमवर असतील.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel