Realme, OPPO आणि Google चे दमदार स्मार्टफोन्स लाँच! संपूर्ण लिस्ट आणि फीचर्स जाणून घ्या

या आठवड्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत! Realme P3 Ultra, OPPO F29 Series आणि Google Pixel 9a यांसारखे दमदार फोन येणार आहेत. त्यांचे फीचर्स, प्रोसेसर आणि बॅटरीबद्दल जाणून घ्या!

On:
Follow Us

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील आठवड्यात अनेक दमदार फोन बाजारात दाखल होणार आहेत. सर्वप्रथम Realme चे दोन नवीन स्मार्टफोन भारतात एंट्री घेणार असून, त्यानंतर OPPO च्या नवीन F29 सीरीजचे फोन येतील. याशिवाय, Google Pixel 9a देखील याच आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, कोणते स्मार्टफोन्स कधी येणार आहेत आणि त्यांचे खास फीचर्स काय आहेत.

19 मार्च: Realme P3 Ultra आणि Realme P3

Realme आपल्या पहिल्या Ultra स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी तयार आहे. Realme P3 Ultra हा P-Series मधील पहिला अल्ट्रा फोन असेल, जो खास डिझाइन, परफॉर्मन्स आणि कॅमेरा या गोष्टींवर भर देणार आहे. या फोनमध्ये नवीन MediaTek Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर असेल, जो उत्तम परफॉर्मन्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा फोन Quad-Curved Display असलेला सर्वात पातळ स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.

Realme P3 Ultra मध्ये 50MP Sony IMX896 कॅमेरा असेल, जो 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सक्षम असेल. याशिवाय, यात 6000mAh बॅटरी असेल, जी दीर्घकालीन बॅटरी बॅकअप देईल.

Realme P3 देखील 19 मार्च रोजी Ultra मॉडेलसोबतच लॉन्च होणार आहे. हा Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर असलेला भारताचा पहिला फोन असेल. यामध्ये 6050mm² व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम असेल, जी दीर्घकाळ फोन गरम होऊ नये यासाठी मदत करेल. यात 120Hz AMOLED डिस्प्ले आणि IP69 वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्स रेटिंग असेल. या फोनमध्येही 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे.

20 मार्च: OPPO F29 Series

20 मार्चला OPPO आपली F29 आणि F29 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स टिकाऊपणाच्या दृष्टीने SGS या स्विस कंपनीने टेस्ट केले आहेत. यामध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळाल्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे.

या स्मार्टफोन्समध्ये 360° Armor Body डिझाइन असेल, जो फोनला अधिक मजबूत बनवतो. याशिवाय, 6000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. काही लीक्सनुसार, हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह येऊ शकतो.

20 मार्च: Google Pixel 9a

Google चा नवीन Pixel 9a देखील 20 मार्च रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. आधी असे सांगितले जात होते की हा फोन Google I/O 2025 इव्हेंटमध्ये सादर केला जाईल, मात्र अलीकडील लिक्सनुसार हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 6.28-इंच OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. परफॉर्मन्ससाठी, यात Google Tensor G4 चिपसेट आणि नवीनतम Android 15 सॉफ्टवेअर असेल.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel