महिला आणि मुलींसाठी सुरू करण्यात आलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने 31 मार्च 2023 रोजी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ही योजना सुरू केली होती. ही योजना 2 वर्षांसाठी लागू करण्यात आली होती. त्यामुळे 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे.
31 मार्चनंतर बंद होणार योजना?
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (MSSC) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. सरकारने सध्या या योजनेच्या कालावधीला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे 31 मार्च 2025 नंतर ही योजना बंद होऊ शकते. मात्र, सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा.
महिलांसाठी फायदेशीर योजना
ही योजना विशेषतः महिला आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली होती. महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी आणि बचतीला चालना मिळावी, यासाठी सरकारने दोन वर्षांच्या मुदतीची ही योजना राबवली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना आकर्षक परतावा मिळतो.
ब्याजदर किती आहे?
- या योजनेत 2 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.
- यावर 7.5% वार्षिक व्याज मिळते, जे बहुतांश बँकांच्या 2 वर्षांच्या एफडीच्या व्याजदरांपेक्षा अधिक आहे.
- ही योजना सुरक्षित आहे कारण ती भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे.
- पोस्ट ऑफिस किंवा रजिस्टर बँकांमध्ये सहजपणे खाते उघडता येते.
गुंतवणुकीची मर्यादा किती आहे?
- योजनेत किमान 1,000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये गुंतवता येतात.
- 2 वर्षानंतर संपूर्ण रक्कम आणि व्याज परत मिळते.
- खातेदाराला 1 वर्षानंतर 40% रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते.
महिला सन्मान योजनेच्या महत्त्वाच्या अटी
- ज्या महिला भारताच्या रहिवासी आहेत, त्या या योजनेसाठी पात्र आहेत.
- खातेदाराच्या गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची परवानगी दिली जाते.
- मात्र, खाते उघडल्यापासून 6 महिन्यांच्या आत बंद केल्यास व्याजदर कमी केला जाऊ शकतो.
31 मार्च 2025 पर्यंत करा गुंतवणूक!
सरकारने सध्या या योजनेला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. महिलांसाठी ही योजना एक सुरक्षित आणि उच्च परतावा देणारा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नसेल, तर वेळ न घालवता यामध्ये गुंतवणूक करा आणि भविष्य सुरक्षित करा!