Poco F7 सिरीज स्मार्टफोन मार्च महिन्याच्या या तारखेला होणार लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स & फीचर्स

Poco F7 सिरीजची लॉन्च डेट लीक झाली आहे. या सिरीजमध्ये Poco F7 Ultra, Poco F7 Pro आणि Poco F7 स्मार्टफोन असणार आहेत. जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

On:
Follow Us

Poco लवकरच ग्लोबल मार्केटसाठी आपली नवीन F7 सिरीज लॉन्च करणार असल्याचे अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे. एका X युजरने शेअर केलेल्या पोस्टरनुसार, ही सिरीज 27 मार्च रोजी लाँच केली जाण्याची शक्यता आहे. पोस्टरमध्ये दिसत आहे की, या लाईनअपमध्ये अल्ट्रा-ब्रँडेड स्मार्टफोन समाविष्ट असू शकतो. चला तर मग, Poco F7 सिरीजबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Poco F7 सिरीज लवकरच होणार लॉन्च

अहवालांनुसार, Poco F7 सिरीजमध्ये तीन मॉडेल्स – Poco F7 Ultra, Poco F7 Pro आणि Poco F7 असतील. Poco F7 Ultra आणि Poco F7 Pro हे 27 मार्च रोजी सादर होण्याची शक्यता आहे, तर Poco F7 दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाऊ शकतो.

Poco F7 Ultra स्पेसिफिकेशन्स

Poco F7 Ultra हा Redmi K80 Pro चा रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले आणि 2K रिझोल्यूशन मिळण्याची शक्यता आहे. हा फोन Snapdragon 8 Elite चिपसेटसह येऊ शकतो. बॅटरीबाबत सांगायचे तर, F7 Ultra मध्ये 5,300mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. मात्र, Redmi K80 Pro मध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे.

हा फोन अलीकडेच Geekbench प्लॅटफॉर्मवर AI परफॉर्मन्स स्कोअरसोबत दिसला होता. नवीन बेंचमार्क लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट, 16GB RAM आणि Android 15 ऑपरेटिंग सिस्टम असेल. या फोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 2,300 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 8,150 स्कोअर मिळवला आहे.

Poco F7 Pro स्पेसिफिकेशन्स

Poco F7 Pro हा Redmi K80 चा रीब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. यात 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिझोल्यूशन असेल. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सादर होऊ शकतो. Redmi K80 मध्ये 6,550mAh बॅटरी आहे, परंतु F7 Pro मध्ये 6,000mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग असण्याची शक्यता आहे.

Redmi एप्रिल महिन्यात चीनमध्ये नवीन Snapdragon 8s Elite प्रोसेसर असलेला Redmi Turbo 4 Pro सादर करू शकतो. भारतात हा फोन Poco F7 म्हणून रीब्रँड केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, भारतात फक्त Poco F7 मॉडेलच लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel