भारतीय मोबाइल ब्रँड Lava ने गेल्या वर्षी dual AMOLED Display असलेला 5G स्मार्टफोन Lava Agni 3 भारतात लॉन्च केला होता. या फोनमध्ये फ्रंटसोबतच बॅक पॅनलवरही डिस्प्ले देण्यात आला आहे. आता कंपनी हा स्टायलिश स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. लावा अग्नि 3 5G फोन स्वस्तात कसा आणि कुठे खरेदी करता येईल, याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे मिळेल.
स्मार्टफोन ऑफर
Lava Agni 3 5G फोन 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंटमध्ये ₹22,999 च्या किंमतीत लॉन्च झाला होता. आता या फोनवर ₹3,000 चा डिस्काउंट मिळत आहे. ही सूट Amazon वर उपलब्ध आहे आणि हा कूपन डिस्काउंट सर्व ग्राहकांना लागू आहे. लावाच्या या 5G स्मार्टफोन ला Heather Glass आणि Pristine Glass कलरमध्ये खरेदी करता येईल.
3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Lava Agni 3 स्मार्टफोन ₹19,999 मध्ये खरेदी करता येईल. विशेष म्हणजे, ही सूट मिळवण्यासाठी कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ची गरज भासणार नाही. याशिवाय, अमेझॉन या सूटसोबतच ₹1 चा अतिरिक्त प्राइस ऑफरही देत आहे.
ड्युअल डिस्प्ले असलेला फोन
Lava Agni 3 हा dual display असलेला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूंना स्क्रीन देण्यात आली आहे. यामुळे या फोनचे डिझाईन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे दिसते. या फोनमध्ये असलेल्या सेकंडरी डिस्प्ले ला Insta Screen असे नाव देण्यात आले आहे. या AMOLED पॅनेल वर कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्स पाहता येतील आणि त्याचबरोबर थेट अॅक्सेसही करता येईल.
या Insta Screen वरून फोनमधील मीडिया कंटेंट प्ले करता येईल. याशिवाय, याच सेकंडरी डिस्प्ले द्वारे रिअर कॅमेराचा वापर करून सेल्फी काढता येईल. फोनच्या राइट फ्रेम वर Action Key देण्यात आली आहे, जी विविध टास्कसाठी शॉर्टकट बटण म्हणून काम करेल.
Lava Agni 3 ची डिस्प्ले क्वालिटी
Lava Agni 3 5G फोनमध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2652 x 1220 पिक्सल रिझोल्यूशन ला सपोर्ट करतो. हा 3D Curved AMOLED Display आहे, जो 120Hz Refresh Rate आणि 1200nits Brightness सह येतो. यामध्ये In-display Fingerprint Sensor देण्यात आला आहे. तसेच, Netflix आणि OTT अॅप्ससाठी Widevine L1 सपोर्टदेखील मिळतो.
फोनच्या बॅक पॅनलवर 1.74-इंच 2D AMOLED सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 336 x 480 पिक्सल रिझोल्यूशन ला सपोर्ट करतो. याचा उपयोग रिअर कॅमेरा सेल्फी, कॉल आणि मेसेज रिप्लाय, नोटिफिकेशन्स, म्युझिक कंट्रोल, अलार्म, टाइमर, स्टॉपवॉच आणि फिटनेस ट्रॅकरसाठी केला जाऊ शकतो.
Lava Agni 3 ची स्पेसिफिकेशन्स
✔ प्रोसेसर: MediaTek Dimensity 7300X ऑक्टा-कोर प्रोसेसरवर हा 5G स्मार्टफोन काम करतो. हा 4nm Fabrication वर आधारित CPU असून यामध्ये 2.5GHz क्लॉक स्पीडवर चालणारे Arm Cortex-A78 आणि Cortex-A55 कोर आहेत. हा फोन Large Vapour Chamber Cooling Technology सह येतो, त्यामुळे गेमिंग दरम्यान फोन हिट होणार नाही.
✔ मेमरी: Lava Agni 3 5G फोन 8GB LPDDR5 RAM सह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 8GB एक्स्टेंडेड रॅम टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे एकूण 16GB RAM चा परफॉर्मन्स मिळतो. हा मोबाइल UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
✔ कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Lava Agni 3 मध्ये Triple Rear Camera सेटअप देण्यात आला आहे. Sony IMX766 OIS सेंसरसह 50MP Primary Camera, 8MP Ultra-wide Lens आणि 8MP Telephoto Lens आहे. हा कॅमेरा 3X Optical Zoom, 4K@30fps Video Recording आणि EIS Support सह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP Front Camera आहे.
✔ बॅटरी: फोनमध्ये 5000mAh Battery देण्यात आली आहे, जी 66W Fast Charging सपोर्ट करते.
✔ अन्य फीचर्स: हा स्मार्टफोन 14 5G Bands, Wi-Fi 6e, Bluetooth 5.4, OTG, आणि NavIC ला सपोर्ट करतो. तसेच, हा फोन IP64 Certified असून तो पाणी आणि धुळीपासून संरक्षण देतो.