ASUS TUF Gaming F16 Laptop: तैवानची टेक कंपनी ASUS भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन गेमिंग लॅपटॉप लॉन्च करत आहे. कंपनी लवकरच ASUS TUF Gaming F16 हा लॅपटॉप भारतीय बाजारात सादर करणार आहे. आता कंपनीने या लॅपटॉपच्या अधिकृत लॉन्च डेटची घोषणा केली आहे.
Amazon वर या डिव्हाइससाठी समर्पित मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे, जिथे लॉन्च डेटसह या लॅपटॉपचे काही खास फीचर्स उघड झाले आहेत. या आगामी गेमिंग लॅपटॉपमध्ये काय खास असेल, यावर एक नजर टाकूया.
भारतात या दिवशी होणार ASUS TUF Gaming F16 लॉन्च
Amazon वर लाईव्ह झालेल्या मायक्रोसाइटनुसार, ASUS 12 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय बाजारात आपला TUF Gaming F16 लॅपटॉप मॉडेल (FX607) लॉन्च करणार आहे. कंपनीने या लॅपटॉपला “Expansive Immersion. Mechanized Performance” ही टॅगलाइन देत टीझ केले आहे. मायक्रोसाइटवर लॅपटॉपच्या काही खास फीचर्सची माहिती समोर आली आहे.
लॅपटॉपमध्ये मिळतील हे दमदार फीचर्स
मायक्रोसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ASUS TUF Gaming F16 लॅपटॉपमध्ये NVIDIA GeForce RTX 3050A GPU असेल, जो 65W पर्यंत Total Graphics Power (TGP) सपोर्ट करेल. लॅपटॉपमध्ये स्लिम बेझलसह मोठी डिस्प्ले स्क्रीन असेल, जी Full HD+ रिझोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 300 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करेल. दमदार GPU आणि डिस्प्ले यामुळे युजर्सना जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस मिळेल.
याशिवाय, उच्च कार्यक्षमता आणि पॉवर एफिशियंसी साठी हा गेमिंग लॅपटॉप Intel Core i5 Processor सह येईल, ज्यामध्ये 8 कोर आणि 12 थ्रेड्स असतील.
लॉन्च फक्त काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे लाँचपूर्वी याचे इतर स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सही टीझ होऊ शकतात. हा लॅपटॉप Amazon Exclusive असण्याची शक्यता आहे आणि लॉन्चनंतर याची विक्री Amazon वरूनच केली जाणार आहे.