MWC (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस) 2025 मध्ये Tecno ने आपली Camon 40 सिरीज सादर केली आहे. या सिरीजमध्ये दोन 4G आणि दोन 5G स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये Tecno Camon 40 4G, Camon 40 Pro 4G, Camon 40 Pro 5G आणि Camon 40 Premier 5G हे स्मार्टफोन समाविष्ट आहेत.
Tecno Camon 40 Pro 4G आणि 5G या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.78-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा 1080 पिक्सल रिझोल्यूशन आहे. पंच-होल डिझाइन असलेल्या या स्क्रीनमध्ये Camon 40 Pro 4G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट तर Camon 40 Pro 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट केला आहे.
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HiOS वर चालतो. प्रोसेसिंगसाठी MediaTek चिपसेट देण्यात आले असून, Camon 40 Pro 4G मध्ये Helio G100 ऑक्टा-कोर प्रोसेसर, तर Camon 40 Pro 5G मध्ये Dimensity 7300 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
या फोनमध्ये दमदार स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. Camon 40 Pro 4G मध्ये 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत. दुसरीकडे, Camon 40 Pro 5G मध्ये 8GB + 128GB आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. मात्र, हे स्मार्टफोन भारतीय बाजारात कोणत्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होतील, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह), 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि AI सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरा सपोर्ट करतो, जो उत्तम फोटो काढण्यास सक्षम आहे.
बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, Camon 40 Pro 4G आणि 5G स्मार्टफोन्समध्ये 5,200mAh बॅटरी आहे. यासोबतच, हे डिव्हाइस 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते, त्यामुळे फोन जलद चार्ज होतो आणि अधिक काळ टिकतो.














