Xiaomi 15 भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये सादर झाल्यापासून शाओमी चाहत्यांना त्याच्या भारतातील लॉन्चची प्रतीक्षा होती. प्रीमियम लुक आणि फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेल्या Xiaomi 15 सोबतच या सिरीजमधील Xiaomi 15 Ultra देखील ग्लोबल स्तरावर सादर करण्यात आला आहे. Xiaomi 15 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
Xiaomi 15 स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
शाओमी 15 मध्ये 2670 × 1200 पिक्सल रिझोल्यूशन असलेली 6.36-इंच फुलएचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आली आहे. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. कंपनीने या डिस्प्लेसाठी कस्टमाइझ्ड M9 Luminous Material चा वापर केला आहे. विशेष म्हणजे Xiaomi 15 मध्ये बेजल्स फक्त 1.38mm जाड आहेत.
प्रोसेसर
Xiaomi 15 हा Qualcomm च्या 3nm फॅब्रिकेशनवर आधारित Snapdragon 8 Elite ऑक्टा-कोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा चिपसेट 4.32GHz क्लॉक स्पीडवर कार्य करू शकतो, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता 45% पर्यंत वाढते.
कॅमेरा
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Xiaomi 15 मध्ये 32MP चा OmniVision OV32B40 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनच्या मागील बाजूस ट्रिपल Leica रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP LYT900 सेन्सर (f/1.62 अपर्चर), 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स (f/2.2 अपर्चर) आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे.
बॅटरी
शाओमी 15 मध्ये 5,240mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या मोठ्या बॅटरीसाठी 90W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन Surge G1 Battery Management Chip आणि Surge P3 Fast Charging Chip सह सुसज्ज आहे, जी बॅटरीचे आरोग्य टिकवून ठेवते आणि चार्जिंगदरम्यान तापमान नियंत्रण करते.
Xiaomi 15 किंमत
Xiaomi 15 5G स्मार्टफोन 999 युरो किंमतीत ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज मिळते. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे ₹90,500 इतकी आहे. कंपनी 11 मार्च दुपारी 12 वाजता भारतात याची अधिकृत किंमत जाहीर करणार आहे. त्यासंबंधित सर्व सेल डिटेल्स आणि ऑफर्सची माहिती लवकरच अपडेट केली जाईल. Xiaomi 15 बद्दल अधिकृत माहिती कंपनीच्या India Website वर पाहता येईल.