स्मार्टफोन निर्माता Vivo चा सब-ब्रँड iQOO लवकरच आपली नवीन iQOO Z10 सीरीज लाँच करू शकतो. या मालिकेत iQOO Z10x, Z10, Z10 Turbo आणि Z10 Turbo+ हे चार मॉडेल्स समाविष्ट असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, कंपनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Neo 10S सीरीज देखील लॉन्च करू शकते, जी Neo 10 लाइनअप च्या अपग्रेडेड व्हर्जन म्हणून येऊ शकते. चला जाणून घेऊया या नवीन स्मार्टफोन्सबद्दल लीक झालेल्या महत्त्वाच्या माहितीसंदर्भात.
2K डिस्प्ले आणि दमदार बॅटरीचा सपोर्ट
प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station यांनी iQOO Neo 11 सीरीज संदर्भातील महत्त्वाचे तपशील उघड केले आहेत. चायनीज मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर त्यांनी फोनचे नाव न घेता सांगितले आहे की, या नवीन डिव्हाइसेसमध्ये 2K फ्लॅट डिस्प्ले मिळेल, तर मागील मॉडेल्समध्ये 1.5K डिस्प्ले होता. याशिवाय, बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत देखील महत्त्वाचे अपग्रेड दिले जातील.
7000mAh क्षमतेची तगडी बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग
लीक्सनुसार, iQOO Neo 11 सीरीज मध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळू शकते, जी जबरदस्त बॅटरी बॅकअप देईल. याशिवाय, हा फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज असेल. विशेष म्हणजे, नवीन फोनमध्ये 3D अल्ट्रा-सोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. याशिवाय, स्मार्टफोनचा मजबूत बांधणीसाठी मेटल मिडिल फ्रेम वापरण्यात आली आहे.
प्रोसेसर आणि ग्लोबल लॉन्चबद्दल माहिती
iQOO Neo 11 आणि Neo 11 Pro हे अनुक्रमे Neo 10 आणि Neo 10 Pro चे सक्सेसर मॉडेल्स म्हणून बाजारात येतील. मात्र, या स्मार्टफोन्समध्ये कोणते प्रोसेसर वापरण्यात येणार आहेत, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, iQOO Neo 11 मध्ये Snapdragon 8 Elite आणि Neo 11 Pro मध्ये Dimensity 9500 प्रोसेसर मिळू शकतो.
सर्वप्रथम हे डिव्हाइसेस कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच केले जातील आणि नंतर इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे.