Realme P3 Pro 5G First Sale: रियलमीने मागील आठवड्यात आपल्या डार्क कलर चेंजिंग स्मार्टफोन Realme P3 Pro 5G लाँच केला होता. आज 25 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्ट, रियलमीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याशिवाय, तो गेमिंग मोड सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया की Realme P3 Pro 5G फर्स्ट सेलमध्ये किती रुपयांना खरेदी करता येईल आणि कोणते डिस्काउंट मिळणार आहेत.
Realme P3 Pro 5G फर्स्ट सेल ऑफर्स
Realme P3 Pro 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे –
- 8GB + 128GB – ₹23,999
- 8GB + 256GB – ₹24,999
- 12GB + 256GB – ₹26,999
फर्स्ट सेलमध्ये ₹2,000 बँक डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहकांना हा फोन अनुक्रमे ₹21,999, ₹22,999 आणि ₹24,999 मध्ये खरेदी करता येईल.
Realme P3 Pro 5G चे दमदार फीचर्स
Realme P3 Pro 5G मध्ये 6.7-इंच क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोनला Snapdragon 7s Gen 3 5G प्रोसेसरसह उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळतो. यामध्ये 6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
फोनमध्ये NextAI फीचर्स अंतर्गत AI रेकॉर्डिंग, AI रायटर, AI रिप्लाय आणि सर्कल टू सर्च यांसारख्या आधुनिक फिचर्स दिल्या आहेत.
Realme P3 Pro 5G च्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी शूटर दिला आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनला IP69 सर्टिफिकेशन मिळाले आहे, म्हणजे तो पाण्यात बुडाल्यावरही व्यवस्थित काम करू शकतो.
या डिव्हाइसला 2 वर्षांचे Android OS अपडेट आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.