Samsung आपली Galaxy S सीरीजमधील नवी स्मार्टफोन लाइनअप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या फोनचं नाव Galaxy S25 Edge असणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात झालेल्या Galaxy S25 Series लाँच इव्हेंटमध्ये या अपकमिंग डिव्हाइसचं प्रदर्शन केलं होतं.
मात्र, फोनची अधिकृत लॉन्च डेट कंपनीने अद्याप घोषित केलेली नाही. दरम्यान, GizmoChina च्या अहवालानुसार यूट्यूबर Alexis Garza ने या फोनचा एक हँड्स-ऑन व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये Galaxy Z Fold 6 सोबत या फोनची तुलना करण्यात आली होती आणि याच्या स्लिम प्रोफाइल बद्दल माहिती देण्यात आली होती.
हा व्हिडिओ सध्या हटवण्यात आला असला तरी, त्यातून फोनच्या अल्ट्रा-थिन डिझाइन आणि हार्डवेअरबद्दल महत्त्वाच्या डीटेल्स समोर आल्या आहेत.
सेरामिक फिनिशसह शानदार रियर लुक
लीक झालेल्या माहितीनुसार, Galaxy S25 Edge हा Samsung च्या सर्वात स्लिम फोन्स पैकी एक असणार आहे. अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या फोनची जाडी 5.48mm असू शकते. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की, फोनचा बॅक पॅनल सेरामिक फिनिश असणार आहे, ज्यामुळे त्याला एक प्रीमियम लुक मिळेल.
फोनचं कॅमेरा मॉड्यूल दिसायला Galaxy Z Fold 6 सारखं असलं तरी त्याचा आकार तुलनेने लहान असेल. या फोनमध्ये 4000mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते.
मिलू शकतो Snapdragon 8 Elite चिपसेट
लीक रिपोर्ट्सनुसार, Samsung च्या या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा फोन स्लिम डिझाइनमध्ये असूनही त्याच्या परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या AIDA64 अॅपच्या माहितीनुसार, हा फोन Snapdragon 8 Elite चिपसेटवर चालतो.
कंपनी हा डिव्हाइस 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते. मात्र, फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शानदार कॅमेरा सेटअपची अपेक्षा
AIDA64 अॅपमध्ये हा फोन 12MP चे तीन कॅमेरा सेंसर असलेला असल्याचं आढळलं. मात्र, काही अहवालांनुसार यामध्ये 200MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी या फोनमध्ये Bluetooth 5.4 देऊ शकते. सध्या फोनच्या लाँच डेटबद्दल कोणतीही निश्चित माहिती नाही. परंतु, कंपनी हा फोन MWC 2025 मध्ये सादर करू शकते.