LIC ची नवीन पेन्शन स्कीम: भारतीय जीवन विमा निगम (LIC) एक नवीन पेन्शन स्कीम घेऊन आला आहे. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना फिक्स पेन्शनचा पर्याय मिळणार आहे. चला जाणून घेऊया या नवीन पेन्शन स्कीमबद्दल सर्व माहिती.
LIC ची एकल प्रीमियम पेन्शन स्कीम
भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने एकल प्रीमियम असलेली ‘स्मार्ट’ पेन्शन स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम वैयक्तिक तसेच संयुक्तरित्या पेन्शनसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देते. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू आणि LIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी या योजनेचे सादरीकरण केले. या प्रसंगी वित्त मंत्रालय आणि LIC चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. LIC ने एका निवेदनात म्हटले आहे की, पॉलिसीच्या अटींनुसार आंशिक किंवा पूर्ण रकमेच्या पैसे काढण्यास विविध लिक्विडिटी पर्याय उपलब्ध आहेत. पेन्शन योजनेअंतर्गत किमान खरेदी मूल्य 1 लाख रुपये आहे.
LIC स्मार्ट पेन्शन योजनेचे डिटेल्स
- किमान खरेदी मूल्य = रु.1,00,000/-
- कमाल खरेदी मूल्य = कोणतीही मर्यादा नाही (मात्र, कमाल खरेदी मूल्य हे बोर्डाने मान्य केलेल्या अंडररायटिंग
- धोरणानुसार मंजुरीच्या अधीन असेल)
- किमान एन्युटी = किमान एन्युटी रक्कम पुढीलप्रमाणे असेल:
- 1,000 रुपये प्रतिमहिना
- 3,000 रुपये प्रतिमहात्रैमासिक
- 6,000 रुपये प्रति सहामाही
- 12,000 रुपये प्रतिवर्ष
- वार्षिकी पेमेंटच्या निवडलेल्या प्रकारावर अवलंबून
- कमाल एन्युटी = कोणतीही मर्यादा नाही
- प्रीमियम भरण्याची पद्धत = सिंगल प्रीमियम
पेन्शन स्कीमच्या प्रमुख वैशिष्ट्ये
- एकल प्रीमियम एन्युटी योजना
- ग्राहकांच्या गरजेनुसार वार्षिकी पर्यायांची विस्तृत श्रेणी
- प्रवेशासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 ते 100 वर्षे (वार्षिकी पर्यायावर अवलंबून)
- सिंगल एन्युटी प्लान आणि जॉइंट एन्युटी प्लान यांपैकी निवड करण्याची सुविधा
- विद्यमान पॉलिसीधारक आणि मृत पॉलिसीधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीसाठी (nominee/beneficiary) वाढीव वार्षिकी दराचा लाभ
- पॉलिसीच्या अटींनुसार आंशिक/पूर्ण रकमेच्या पैसे काढण्यासाठी विविध लिक्विडिटी पर्याय उपलब्ध
- किमान खरेदी मूल्य 1,00,000 रुपये असून उच्च खरेदी मूल्यासाठी प्रोत्साहन उपलब्ध
- वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक वार्षिकी पेमेंटचे पर्याय
- एन्युटी पेमेंटच्या निवडलेल्या प्रकारानुसार वार्षिकी रक्कमेची गणना केली जाईल
- NPS सदस्यांना तात्काळ एन्युटी घेण्याचा पर्याय उपलब्ध
- या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीसाठीही (विकलांग व्यक्ती) पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध
- ही योजना www.licindia.in वरून ऑनलाइन खरेदी करता येईल
- पॉलिसी पूर्ण होण्याच्या तीन महिन्यांनंतर (म्हणजेच पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून तीन महिने) किंवा फ्री लुक कालावधी संपल्यानंतर कधीही पॉलिसी लोन घेण्याचा पर्याय उपलब्ध
एन्युटी प्लान म्हणजे काय?
एन्युटी प्लान हे रिटायरमेंट प्लान्स असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही निवृत्तीनंतर नियोजित उत्पन्न मिळवू शकता. हे उत्पन्न तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीच्या आधारे नियमित स्वरूपात किंवा एकरकमी रूपात मिळवू शकता.