Vivo V50 Launched: Vivo ने आपला नवीन कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन Vivo V50 भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी, ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, आणि क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
हा 6000mAh बॅटरी असलेला सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. Vivo V50 मध्ये ZEISS सह को-इंजिनिअर्ड कॅमेरा आहे. हा फोन IP68 आणि IP69 रेटिंग सह येतो, त्यामुळे तो वॉटरप्रूफ आहे. तसेच, यात AI (artificial intelligence) फीचर्स सपोर्ट दिला आहे.
Vivo V50 ची भारतातील किंमत आणि उपलब्धता:
Vivo V50 हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ₹34,999, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹36,999, तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत ₹40,999 आहे. या फोनसाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे आणि विक्री 25 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.
Vivo V50 बँक ऑफर्स आणि कलर पर्याय:
Vivo V50 खरेदी करताना शून्य डाउन पेमेंट, एक्सचेंज बोनस, तसेच SBI आणि HDFC बँक कार्डांवर 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल. हा फोन Rose Red, Titanium Grey आणि Starry Night या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Vivo V50 डिस्प्ले आणि परफॉर्मन्स:
Vivo V50 मध्ये 6.77-इंचाचा क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 2392×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500nits लोकल पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेचे संरक्षण Diamond Shield Glass ने करण्यात आले आहे.
हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर वर चालतो आणि यात 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB UFS 2.2 स्टोरेज आहे. हा डिव्हाइस Android 15 आधारित Funtouch OS 15 वर चालतो आणि 3 वर्षांचे Android अपडेट्स व 4 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स मिळतात.
Vivo V50 बॅटरी आणि चार्जिंग:
या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन एकाच चार्जमध्ये दीर्घकाळ टिकतो आणि त्याचा चार्जिंग वेग अतिशय जलद आहे.
Vivo V50 कॅमेरा फीचर्स:
Vivo V50 मध्ये ZEISS को-इंजिनिअर्ड कॅमेरा सिस्टम दिली आहे. यात मागील बाजूस 50MP OIS प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP AF फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Vivo चे AI फीचर्स सपोर्ट करतो, ज्यात Circle to Search, Vivo Live Call Translation आणि AI Transcript Assist यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.