Apple च्या किफायतशीर iPhone ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. कंपनी आपल्या आगामी iPhone SE चे लाँचिंग पुढील आठवड्यात करू शकते. अनेक Apple फॅन्सना iPhone SE ची उत्सुकता असते. हा स्मार्टफोन लाँच करण्यामागे कंपनीचे उद्दिष्ट अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आहे. जे वापरकर्ते इतर ब्रँडमधून Apple मध्ये स्विच करू इच्छितात, त्यांच्यासाठी iPhone SE एक उत्तम आणि परवडणारा पर्याय ठरतो.
iPhone SE लाँचिंगबाबत आलेल्या नव्या लीकनुसार, कंपनी हा डिव्हाइस पुढील आठवड्यात रिलीज करू शकते. Bloomberg च्या अहवालानुसार, यासाठी Apple कोणताही लाँच इव्हेंट आयोजित करणार नाही, तर तो थेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
iPhone SE ची विक्री फेब्रुवारीच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या मॉडेलमध्ये iPhone 14 सारखा डिझाइन असणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, यात Apple Intelligence (AI Software) चा सपोर्टही मिळण्याची शक्यता आहे.
iPhone SE चा लाँच जवळ आल्याचे संकेत आता मिळत आहेत. अहवालानुसार, अमेरिकेतील अनेक रिटेल स्टोअर्समध्ये सध्याचा iPhone SE चा स्टॉक संपला आहे. असे सहसा तेव्हाच घडते, जेव्हा कंपनी नवीन मॉडेलचा स्टॉक आणण्याच्या तयारीत असते.
काही स्टोअर्समधील Apple कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, मागील काही आठवड्यांपासून स्टॉक कमी होत आहे. त्यामुळे, विशिष्ट कॉन्फिगरेशनमधील iPhone SE खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना उपलब्धता नसल्यामुळे परत जावे लागत आहे.
आता देखील सध्याचा iPhone SE Apple Online Store वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र, काही व्हेरिएंटसाठी मोठ्या प्रतीक्षेचा कालावधी दिला जात आहे. यामध्ये 256GB रेड वेरिएंट देखील समाविष्ट आहे, जो मार्च महिन्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता नाही. अद्याप Apple कडून या परिस्थितीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.