जर तुम्ही बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच लाँच झालेला लो-बजेट स्मार्टफोन Infinix Smart 9 HD उद्या, म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा Infinix Smart 9 लाइनअपमधील पहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंच HD+ डिस्प्ले मिळतो.
वर्चुअल रॅमसह हा फोन एकूण 6GB पर्यंत रॅम सपोर्ट करतो. यामध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स आणि DTS ऑडिओ प्रोसेसिंग सपोर्ट दिला आहे. फोन IP54-रेटेड असून, तो पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित राहतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हा आपल्या सेगमेंटमधील सर्वात टिकाऊ (durable) स्मार्टफोन आहे.
Infinix Smart 9 HD ची किंमत
Infinix Smart 9 HD भारतात 6,699 रुपये किंमतीत लाँच झाला आहे. मात्र, स्पेशल डे वन ऑफर अंतर्गत तो 6,199 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 4 फेब्रुवारीपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तो मिंट ग्रीन, कोरल गोल्ड, निओ टायटॅनियम आणि मेटालिक ब्लॅक या चार कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
Infinix Smart 9 HD चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 500 nits ब्राइटनेस सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआउट दिला आहे. दमदार ऑडिओसाठी यामध्ये DTS ऑडिओ प्रोसेसिंग आणि साउंड बूस्ट टेक्नॉलॉजी सह ड्युअल स्पीकर्स देण्यात आले आहेत. फोनचे डायमेन्शन्स 165.7×77.1×8.35mm आणि वजन 188 ग्रॅम आहे.
फोनमध्ये एकूण 6GB पर्यंत रॅम सपोर्ट
हा स्मार्टफोन 2.2GHz पीक क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर MediaTek Helio G50 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6GB पर्यंत रॅम (3GB फिजिकल + 3GB वर्च्युअल) आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. स्टोरेज microSD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन Android 14 Go Edition वर चालतो, जो लो-स्पेक्स डिव्हाइसेससाठी डिझाइन करण्यात आला आहे.
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा आहे, जो Quad-LED आणि झूम फ्लॅश सह येतो. कॅमेरा सेटअप स्क्वेअर-शेप कॅमेरा आयलंड मध्ये व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे, जो LED फ्लॅश आणि स्क्रीन फ्लॅश सपोर्ट करतो. यात ब्युटी आणि पोर्ट्रेट मोड उपलब्ध आहेत.
मोठी बॅटरी आणि दमदार बॅटरी परफॉर्मन्स
फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 8.6 तासांचा गेमिंग टाइम देऊ शकते. कंपनीने फोनमध्ये AI चार्ज प्रोटेक्शन फीचर दिले आहे, जो ओव्हरचार्जिंगपासून डिव्हाइसचे संरक्षण करतो आणि बॅटरीची आयुष्य वाढवतो.
फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स दिले आहेत.