Samsung New AC Launched: सॅमसंगने भारतात २०२५ लाइनअपमधील Bespoke AI विंडफ्री एअर कंडिशनर लॉन्च केला आहे. कंपनीने सांगितले की, १९ मॉडेल्सची ही नवी रेंज भारतीय वापरकर्त्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञानामुळे थेट हवा टाळली जाते आणि २३,००० मायक्रो होल्सद्वारे हवा हळूहळू पसरवली जाते. एआय फास्ट आणि कम्फर्ट कूलिंग फीचर संपूर्ण रूमला लवकर थंड करते आणि युझरच्या बचतीसाठी ऊर्जा सेटिंग्ज स्वयंचलितपणे बदलत राहतात.
Samsung Wind Free AI AC किंमत आणि उपलब्धता
सॅमसंगने या नवीन लाइनअपची प्रारंभिक किंमत ₹३२,९९० ठेवली आहे. Bespoke एआय एअर कंडिशनरची नवी रेंज फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि Samsung.com सारख्या प्रमुख रिटेल स्टोअर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Samsung AI WindFree Air Conditioners मध्ये मिळतील हे खास फीचर्स
सॅमसंगच्या नवीन एअर कंडिशनर रेंजमध्ये स्मार्टथिंग्स कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे, ज्यामुळे रिमोट मॉनिटरिंगसाठी मॅप व्यू आणि अफर्टलेस कंट्रोलसाठी क्विक रिमोट सारख्या सुविधा उपलब्ध होतात. या एसीला वाय-फायद्वारे सॅमसंगच्या स्मार्टथिंग्स अॅपशी कनेक्ट करता येते, ज्यामुळे वापरकर्ते सेटिंग्ज नियंत्रित करू शकतात.
बिक्सबी व्हॉईस असिस्टंट, अलेक्सा आणि गूगल होमचा वापर करून सेटिंग्ज बदलता येतात किंवा एसी ऑन/ऑफ करता येतो. स्मार्ट एआय ऑटो कूलिंगसह घरात पोहोचण्यापूर्वी आपला रूम स्वतःच थंड होऊ शकतो, तसेच जिओ-फेंसिंग बेस्ड वेलकम कूलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
नवीन एसीमध्ये ‘गुड स्लीप’ मोड देखील आहे, जो रात्रीभर आपोआप हवामान नियंत्रित करतो आणि आपल्याला आरामदायक झोपेची मदत करतो. एआय ऊर्जा मोड ३०% पर्यंत वीज बचत करण्यासाठी कूलिंग सेटिंग्ज आपोआप अॅडजस्ट होतात.