Nothing New Phone Launch: नथिंग कंपनी यावर्षी मार्च महिन्यात आपला पुढचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी यापूर्वीच पुष्टी केली होती की Nothing Phone 3 मार्च 2025 पर्यंत लॉन्च होईल. आता कंपनीने नुकताच एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये नथिंग लवकरच एक नवीन फोन सादर करणार असल्याचे स्पष्ट दिसते.
कंपनीने एक्स (पूर्वी ट्विटर) पोस्टमध्ये एलईडी लाइट्सची एक झलक शेअर केली आहे. नथिंगचा हा फोन 4 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता भारतात सादर होईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. टीझरमध्ये कॅमेरा कट-आउट दाखवण्यात आला आहे, जो ट्रिपल कॅमेरा सेटअपची पुष्टी करतो. हा फोन Nothing Phone 3 किंवा Nothing Phone 3a असण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 3 असेल की Phone 3a?
नथिंग कंपनी प्रथम Phone 3 लॉन्च करण्याची शक्यता आहे. हा टीझर नथिंग फोन 3 लाँचचा असल्याचे दिसते. कंपनीने 2023 मध्ये Nothing Phone 2 लॉन्च केला होता आणि त्यानंतर Phone 2a आणि Phone 2a Plus सारखे फॉलो-अप मॉडेल्स सादर केले होते. त्यामुळे नथिंग आधी Nothing Phone 3 लॉन्च करून नंतर Phone 3a सादर करू शकते.
मात्र, टिपस्टर अभिषेक यादव यांनी असा दावा केला आहे की कंपनी यावेळी फ्लॅगशिप फोनपूर्वी Nothing Phone 3a लॉन्च करून टाइमलाइन मिक्स करेल. Phone 3a लवकरच लॉन्च होईल, असे संकेतही टीझरमध्ये दिसत आहेत, कारण त्याचा कॅमेरा पॅनल Nothing Phone 2a प्रमाणेच दिसतो.
Nothing Phone 3 चे फीचर्स (लीक)
Nothing Phone 3 हा 2023 मध्ये लॉन्च झालेल्या Phone 2 च्या दोन वर्षांनंतर येत आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल, जो त्याच्या आकर्षक डिझाइनला कायम ठेवेल. बेस मॉडेलव्यतिरिक्त, या फोनसोबत प्रो वेरिएंट लॉन्च होईल, ज्यामध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि अनेक प्रीमियम फीचर्स असतील, अशी अफवा आहे.
Nothing Phone 3 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, जो 12GB पर्यंत रॅमसह येईल. तसेच, यामध्ये 512GB UFS 4.0 स्टोरेज पर्याय दिला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.