Lava Yuva Smart लाँच: भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava ने आज लावा युवा स्मार्ट हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. याआधी कंपनीने मागील महिन्यात Lava Yuva 2 5G सादर केला होता. हा नवीन फोन अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे पहिल्यांदाच फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करत आहेत.
Lava Yuva Smart मध्ये मोठी बॅटरी, HD+ रिझोल्यूशनसह मोठा डिस्प्ले, 6GB रॅम, 13MP AI कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. चला, या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि इतर तपशील जाणून घेऊया.
Lava Yuva Smart ची किंमत
Lava Yuva Smart ची भारतात किंमत फक्त ₹6,000 ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्लॉसी लॅव्हेंडर (Glossy Lavender), ग्लॉसी व्हाइट (Glossy White) आणि ग्लॉसी ब्लू (Glossy Blue) या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. लवकरच या फोनची विक्री सुरू होणार आहे. फोनसोबत फ्री होम सर्विस आणि एक वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.
Lava Yuva Smart चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva Smart मध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
कॅमेरा: मागील बाजूस 13MP AI-ड्युअल रियर कॅमेरा. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा. कॅमेरामध्ये AI कॅमेरा मोड, HDR, पोर्ट्रेट आणि नाईट मोड यांसारखे फीचर्स आहेत.
प्रोसेसर आणि रॅम: डिव्हाइस UNISOC 98663A ऑक्टा-कोर प्रोसेसर वर कार्य करते. फोनमध्ये 3GB रॅम आणि 3GB वर्च्युअल रॅम मिळून एकूण 6GB रॅम आहे. 64GB इंटरनल स्टोरेज असून ते 512GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.
सॉफ्टवेअर आणि बॅटरी: Lava Yuva Smart हा Android 14 Go Edition वर कार्यरत आहे. यात 5000mAh बॅटरी असून ती 10W Type-C चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर्स देखील आहेत.