Budget 2025: वर्ष 2025 च्या केंद्रीय बजेटकडून जेष्ठ नागरिक मोठ्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये एक म्हणजे रेल्वे तिकिटांवर पुन्हा सवलत लागू करणे. कोविड-19 महामारीपूर्वी रेल्वे तिकिटांवर 40% ते 50% पर्यंत सवलत दिली जात होती. मात्र, महामारीच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली आणि अद्याप ती पुन्हा सुरू झालेली नाही.
2019 पर्यंत होती सवलत उपलब्ध
2019 च्या अखेरीपर्यंत भारतीय रेल्वे मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या ट्रेन्सच्या तिकिटांवर जेष्ठ नागरिकांना सवलत देत होती. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना 40% सवलत तर 58 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना 50% सवलत मिळत होती. उदाहरणार्थ, राजधानी एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीचे तिकिट 4,000 रुपये असेल, तर जेष्ठ नागरिकांना ते 2,000 ते 2,300 रुपयांमध्ये उपलब्ध होई.
कोविडनंतर सवलत बंद
कोविड-19 महामारी दरम्यान, 2020 मध्ये सरकारने रेल्वे तिकिटांवरील सवलत बंद केली. महामारी संपल्यानंतरही ही सुविधा पुन्हा सुरू झालेली नाही. जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की, निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतात आणि रेल्वे सवलतीमुळे त्यांची प्रवास खर्चात बचत होत असे. त्यामुळे त्यांना सरकारने ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आहे.
बजेट 2025 वर जेष्ठ नागरिकांच्या अपेक्षा
1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला बजेट सादर करणार आहेत. लाखो जेष्ठ नागरिकांचे मत आहे की, सरकारने या बजेटमध्ये त्यांच्या मागणीचा विचार करावा. रेल्वे तिकिटांवरील सवलत पुन्हा लागू केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक किफायतशीर बनेल.
बजेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता
सीनियर सिटीझन्सच्या या अपेक्षांना केंद्र सरकार बजेट 2025 मध्ये मान्यता देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर ही सवलत पुन्हा लागू केली गेली, तर ती लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरेल. आता याचा निर्णय बजेट सादरीकरणाच्या दिवशीच स्पष्ट होईल.