TRAI New Rule: जिओ, एअरटेल, Vi आणि BSNL साठी टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नवीन नियमांची अंमलबजावणी केली, सिम कार्ड युजर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. आता युजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही. जिओ, एअरटेल, Vi आणि BSNL या सर्व प्रमुख नेटवर्कसाठी हे नियम लागू होणार आहेत. चला, या नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Jio (जिओ)
जिओ युजर्ससाठी चांगली बातमी आहे. आता तुमचं सिम रिचार्ज न करता 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहील. इनकमिंग कॉल तुमच्या शेवटच्या रिचार्ज प्लॅननुसार सुरू राहतील, कधी एक आठवडा, कधी एक महिना. परंतु जर 90 दिवसांनंतरही रिचार्ज केले नाही, तर तुमचं सिम बंद होईल आणि ते दुसऱ्या युजरला अलॉट केलं जाईल.
Airtel (एअरटेल)
एअरटेल सिम युजर्सना देखील 90 दिवसांपर्यंत रिचार्ज न करता सिम सक्रिय ठेवण्याची परवानगी मिळेल. यानंतर, युजर्सना 15 दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जाईल. जर या ग्रेस पीरियडमध्येही रिचार्ज केलं नाही, तर सिम बंद होईल आणि ते इतर कोणाला तरी दिलं जाईल. त्यामुळे रिचार्ज वेळेत करणं फायदेशीर ठरेल.
Vodafone-Idea (Vi)
Vodafone-Idea (Vi) च्या युजर्सना सिम सक्रिय ठेवण्यासाठी 90 दिवसांची वैधता मिळेल. मात्र, सिम चालू ठेवण्यासाठी 90 दिवसांनंतर किमान ₹49 चं रिचार्ज करणं आवश्यक आहे.
BSNL (बीएसएनएल)
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने प्रायव्हेट कंपन्यांना मागे टाकलं आहे. BSNL सिम आता 180 दिवसांपर्यंत रिचार्ज न करता सक्रिय राहील. जर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज झालं नसेल, परंतु सिममध्ये ₹20 चा बॅलन्स असेल, तर या बॅलन्सच्या आधारे सिमची वैधता आणखी 30 दिवस वाढवली जाईल. मात्र, जर बॅलन्स नसेल, तर सिम बंद होईल आणि ते नवीन युजरला दिलं जाईल.
नवीन नियमांनुसार सिम सक्रिय ठेवण्यासाठी वेळेत रिचार्ज करणं अत्यावश्यक आहे.