Realme लवकरच आपल्या P सीरिजमधील नवीन स्मार्टफोन्सचे लाईनअप सादर करू शकते. कंपनी सध्या Realme P3 सीरिजवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. या सीरिजमध्ये Realme P3, Realme P3 Pro आणि Realme P3 Ultra असे तीन मॉडेल्स असण्याची शक्यता आहे.
अलीकडील लीक्समधून Realme P3 Pro आणि Realme P3 Ultra च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती समोर आली आहे. आता बेस मॉडेल Realme P3 चे कॉन्फिगरेशन आणि कलर व्हेरिएंट्सही उघड झाले आहेत.
Realme P3 सीरिज लाँच होण्यापूर्वी मोठा लीक समोर आला आहे, ज्यामध्ये फोनचा मॉडेल नंबर, कॉन्फिगरेशन आणि कलर व्हेरिएंट्स उघड करण्यात आले आहेत. 91Mobiles च्या रिपोर्टनुसार, या फोनचा मॉडेल नंबर RMX5070 असेल.
हा फोन तीन वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन्समध्ये उपलब्ध होईल: 6GB+128GB, 8GB+128GB, आणि 8GB+256GB. तसेच, फोन तीन रंगांमध्ये सादर केला जाईल: नेब्युला पिंक (Nebula Pink), कॉमेट ग्रे (Comet Grey) आणि स्पेस सिल्व्हर (Space Silver).
Realme ने यापूर्वी P2 सीरिजमध्ये फक्त एक मॉडेल सादर केले होते, ज्याला Realme P2 Pro म्हणतात. मात्र, यावेळी कंपनी तीन मॉडेल्स बाजारात आणण्याची तयारी करत आहे. मागील मॉडेलच्या आधारे या सीरिजच्या स्पेसिफिकेशन्सचा अंदाज वर्तवला जात आहे.
Realme P2 Pro 5G मध्ये 6.7 इंच फुल HD+ कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सल आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण आहे. IP65 रेटिंग असलेल्या या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो.
रियरमध्ये 50 मेगापिक्सलचा OIS सपोर्टसह प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5200mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.