Honorकंपनीने आपल्या नवीनतम टॅबलेट Honor Pad X9 Pro ची घोषणा केली आहे. सध्या हा टॅबलेट चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. या नवीन टॅबलेटमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा पर्याय दिला गेला आहे.
चीनमध्ये याची सुरूवातीची किंमत 1099 युआन (सुमारे 12,900 रुपये) आहे. त्याची विक्री 10 जानेवारीपासून सुरू होईल. या टॅबलेटमध्ये 11.5 इंचाचा 2K डिस्प्ले आणि 8300mAh ची विशाल बॅटरी असून अनेक प्रभावी फीचर्स आहेत. चला तर मग, Honor Pad X9 Pro च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Honor Pad X9 Pro च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या टॅबमध्ये 2000 x 1200 पिक्सल रिझोल्यूशन असलेला 11.5 इंचाचा 2K डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेमधील पीक ब्राइटनेस लेवल 400 निट्स आहे. या टॅबमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा पर्याय आहे.
प्रोसेसर म्हणून, Honor ने या टॅबमध्ये Snapdragon 685 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, आणि सेल्फी कॅमेरा म्हणून 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या टॅबमध्ये 8300mAh ची बॅटरी आहे, जी 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑपरेटिंग सिस्टीम Android 15 वर आधारित MagicOS 9.0 आहे. उत्कृष्ट आवाजासाठी या टॅबमध्ये क्वॉड स्पीकर सेटअप दिला आहे.
याव्यतिरिक्त, कंपनीने पॅरेन्टल कंट्रोल्स देखील ऑफर केले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 5, Bluetooth 5.1 आणि USB Type-C पोर्टसारखे पर्याय उपलब्ध आहेत.
टॅबचा एकूण वजन 457 ग्राम आहे. Honor ने या टॅबलेटचे तीन आकर्षक रंग पर्याय उपलब्ध केले आहेत – कॅंगशॅन ग्रे, जेड ड्रॅगन स्नो आणि स्काय ब्लू.