Vivo आपल्या टॅब्लेट पोर्टफोलिओचा वेगाने विस्तार करत आहे. कंपनीने यावर्षीची सुरुवात चीनमध्ये Vivo Pad 3 आणि Pad 3 Pro टॅब्लेट लाँच करून केली होती. मार्च महिन्यात कंपनीने Pad 3 Pro लाँच केला होता, ज्यामध्ये Dimensity 9300 चिपसेट होता.
त्यानंतर, जून महिन्यात कंपनीने Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह Pad 3 लाँच केला. आता एका टिप्स्टरने आगामी Vivo Pad 4 Pro बद्दल काही खास तपशील उघड केले आहेत. चला तर मग, आलेल्या माहितीकडे एक नजर टाकूया…
Vivo Pad 4 Pro चे बेसिक स्पेसिफिकेशन्स (लीकनुसार)
Gizmochina ने टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या हवालीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, Vivo Pad 4 Pro मध्ये नियमित आकाराचा कस्टम डिझाइन असलेला डिस्प्ले असू शकतो. यावरून कळते की, यामध्ये 13 इंचाचा LCD पॅनेल असू शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल.
D9400 चिपसेटसह येऊ शकतो टॅब
सदर चिपसेट म्हणजेच Dimensity 9400, ज्याने Vivo च्या अनेक फ्लॅगशिप फोनला पॉवर दिली आहे, ज्यामध्ये Vivo X200, X200 Pro, Oppo Find X8 आणि Find X8 Pro यांचा समावेश आहे. असं दिसतंय की Vivo Pad 4 Pro हा पहिला टॅब असेल ज्यामध्ये D9400 चिपसेट वापरण्यात येईल.
मिळू शकते 12000mAh ची तगडी बॅटरी
लीक मध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, Vivo Pad 4 Pro च्या बॅटरीची रेटेड व्हॅल्यू 11790mAh आहे. त्यामुळे, याची टिपिकल व्हॅल्यू 12000mAh आसपास असू शकते. खेदाची गोष्ट म्हणजे, या डिव्हाइसचे इतर स्पेसिफिकेशन्स सध्या तरी समोर आलेले नाहीत.
कधी लाँच होईल Vivo Pad 4 Pro टॅब्लेट?
आगामी Vivo Pad 4 Pro लाँच कधी होईल, याबद्दल सध्या कोणतीही टाईमलाइन समोर आलेली नाही. Pad 3 Pro मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते, त्यामुळे असे शक्य आहे की, पुढील वर्षी याच वेळी त्याचा successor एडिशन लाँच केला जाईल.
Pad 3 सिरीज फक्त चीनी बाजारापुरती मर्यादित आहे, त्यामुळे यावर कोणतीही स्पष्ट माहिती नाही की ब्रँड Pad 4 सिरीज चीनच्या बाहेर लाँच करणार आहे का नाही.