POCO ने 2024 च्या सुरुवातीला आपली POCO X6 सिरीज लाँच केली होती. त्यातील POCO X6 5G सध्या 5,500 रुपये पर्यंतच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, हा ऑफर डिव्हाइसच्या हाय स्टोरेज मॉडेलवर लागू आहे.
ग्राहकांना बँक ऑफर्स आणि सवलतीसह नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. चला, पुढे या स्मार्टफोनच्या ऑफर्स, किंमत, सेलिंग प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
POCO X6 5G ऑफर्स आणि किंमत
POCO चा हा दमदार स्मार्टफोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये बेस मॉडेलवर 1,500 रुपये आणि टॉप मॉडेल्सवर 5,500 रुपये पर्यंतची सवलत मिळत आहे.
ऑफर्सनुसार, बेस मॉडेल 8GB + 256GB सध्या 18,499 रुपये मध्ये उपलब्ध आहे. तर 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल 17,499 रुपये आणि टॉप मॉडेल 12GB रॅम + 512GB स्टोरेज फक्त 18,499 रुपये मध्ये विकले जात आहे.
लाँच किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास, 8GB + 256GB स्टोरेजसाठी 19,999 रुपये, 12GB + 256GB स्टोरेजसाठी 21,999 रुपये आणि 12GB + 512GB स्टोरेजसाठी 22,999 रुपये होती.
यातील टॉप मॉडेल्सवर 4,500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट आणि 1,000 रुपये बँक ऑफर मिळत आहे, जो SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर लागू होईल.
जर तुम्हाला POCO X6 5G हा फोन नो कॉस्ट EMI च्या माध्यमातून खरेदी करायचा असेल, तर कंपनी 3 ते 6 महिन्यांच्या EMI चा पर्याय देखील देत आहे.
कलर पर्यायांमध्ये ग्राहकांना मिरर ब्लॅक, स्कायलाइन ब्लू आणि स्नोस्ट्रॉम व्हाइट असे तीन पर्याय मिळतात.
कुठून खरेदी कराल POCO X6 5G?
जर तुम्हाला वरील ऑफर्ससह POCO X6 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तो ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वर उपलब्ध आहे. तिथे तुम्ही सर्व डिटेल्स आणि ऑफर्स तपासू शकता.
POCO X6 5G चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: POCO X6 5G मध्ये 6.67 इंचाचा 1.5K AMOLED डॉट डिस्प्ले मिळतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz टच सॅम्पलिंग रेट, 1800 निट्स ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
प्रोसेसर: या फोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह Adreno 710 GPU ग्राफिक्ससाठी आहे.
स्टोरेज आणि रॅम: हा फोन 8GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा (OIS सपोर्ट), 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये 5,100mAh बॅटरीसह 67W टर्बो चार्जिंग सपोर्ट आहे.
कनेक्टिव्हिटी आणि फीचर्स: POCO X6 5G मध्ये ड्युअल सिम 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.2, ड्युअल स्पीकर्स (Dolby Atmos Support), IP54 स्प्लॅश प्रूफ रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, IR Blaster आणि X-Axis Linear Vibration Motor यांसारखी फीचर्स दिली आहेत.
ओएस: हा स्मार्टफोन Android 13 वर लॉन्च झाला असून त्याला भविष्यात अपडेट्स मिळणार आहेत.