SIM Card Rule Change 2025: आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. मोबाइलशिवाय व्यक्ती अपूर्ण वाटते. कोणाचाही मोबाइल एका मिनिटासाठी बंद झाला तरी मोठी समस्या निर्माण होते. मात्र, 1 जानेवारीपासून लाखो सिम-कार्ड कचर्याच्या ढिगाऱ्यात टाकले जाणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सूत्रांच्या मते, टेलिकॉम कंपन्यांकडून डेटा मागवला गेला आहे. मागील वर्षी दूरसंचार विभागाने (DoT) सिम-कार्ड वेरिफिकेशनसाठी (sim card verification) दिलेली वेळ मर्यादा आता संपली आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून लाखो सिम-कार्ड रद्द होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
नियम काय आहे?
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, भारतातील कोणत्याही नागरिकाला आपल्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम-कार्ड ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, जम्मू-काश्मीरसह ईशान्येकडील भागांसाठी 6 सिम-कार्ड ठेवण्याचे प्रावधान आहे. विभागीय माहितीनुसार, एका आयडीवर 9 पेक्षा अधिक सिम ठेवणे बेकायदेशीर मानले जाईल.
हा निर्णय ऑनलाइन फसवणूक आणि गैरवर्तनासंबंधित कॉल्स थांबवण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीर सिम ठेवणाऱ्यांची सिम-कार्ड रद्द करण्याचा प्लॅन दूरसंचार विभाग आखत आहे. याआधीही जानेवारी महिन्यात अशा बेकायदेशीर सिम-कार्ड्सना बंद करण्यात आले होते. यावेळी देखील लाखो बेकायदेशीर सिम-कार्ड्स बंद करण्याची माहिती मिळत आहे.
कोणावर लागू होईल हा नियम?
9 पेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या युजर्सच्या सिम-कार्डवर 30 दिवसांत आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा आणि 45 दिवसांत इनकमिंग कॉल्स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, 2 महिने म्हणजेच 60 दिवसांच्या आत सिम पूर्णपणे डिअॅक्टिव्हेट करण्याची योजना दूरसंचार विभाग आखत आहे. यापूर्वीही विभागाने अनेकदा स्वतःहून सिम-कार्ड बंद करण्याचे आवाहन केले होते.
DoT च्या मते, जर लॉ इन्फोर्समेंट एजन्सी किंवा बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून मोबाइल नंबरविरुद्ध तक्रार मिळाली, तर अशा सिमची आउटगोइंग कॉल्स 5 दिवसांत आणि इनकमिंग कॉल्स 10 दिवसांत बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता.