EPFO 3.0: आता तुम्ही ईपीएफओचे पैसे थेट एटीएममधून काढू शकाल. सरकारने ईपीएफओ-3.0 योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही योजना कधीपासून लागू होणार आहे. ईपीएफओ 3.0 योजना मे-जून 2025 पर्यंत लागू होऊ शकते. त्यानंतर तुम्ही एटीएममधून ईपीएफओचे पैसे सहज काढू शकता. सध्या कर्मचाऱ्यांना पीएफच्या आंशिक रकमेच्या निकासीसाठी अर्ज करावा लागतो.
EPFO 3.0: पीएफ खाते बँकेशी लिंक करावे लागेल
ही नवीन सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे पीएफ खाते बँक खात्याशी लिंक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही एटीएमद्वारे तुमच्या पीएफचे पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे पीएफ खाते लिंक करावे लागेल. लिंक करण्यासाठी तुम्हाला unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरावा लागेल, आणि तुमचे खाते लॉगिन होईल.
EPFO 3.0: पीएफचे पैसे कसे क्लेम करता येतील
सध्याच्या घडीला पीएफ खातेधारकांना पैसे काढण्यासाठी ईपीएफओ पोर्टलला भेट द्यावी लागते. येथे लॉगिन करण्यासाठी यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागतो. लॉगिन झाल्यानंतर ऑनलाइन सर्विसेस या पर्यायावर जाऊन क्लेम या ऑप्शनवर क्लिक करावे लागते. नंतर ऑटो-मोड सेटलमेंट पर्यायावर क्लिक करून बँक खाते व्हेरिफाय करावे लागते. प्रूफ म्हणून पासबुक किंवा चेक अपलोड करणे गरजेचे आहे.
EPFO 3.0: 10 दिवसांत मिळतील पैसे
व्हेरिफिकेशन प्रक्रियेनंतर पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागते. क्लेम केल्यानंतर अंदाजे 10 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.