Best Neckband Under 1500: वायरलेस इयरफोन हा सध्या नवीन ट्रेंड झाला आहे, आणि आता कमी किमतीतही ट्रेंडी इयरबड्स किंवा नेकबँड सहज खरेदी करता येतात. इयरबड्सची समस्या म्हणजे कॉल क्वालिटी कमी मिळते, तसेच व्यायाम किंवा धावण्याच्या वेळी त्यांचे पडण्याचे शक्यता जास्त असते. याच्या तुलनेत नेकबँड उत्तम कॉल क्वालिटी देतात आणि वर्कआउट दरम्यान वापरण्यास सोपे असतात. येथे आम्ही ₹2000 च्या आत मिळणाऱ्या टॉप 5 बेस्ट नेकबँड्सची यादी दिली आहे.
BoAt Rockerz 255 Pro
भारतातील लोकप्रिय ऑडिओ अॅक्सेसरीज ब्रँड boAt चा हा नेकबँड एकदा फुल चार्ज केल्यावर 60 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम देतो. यामध्ये Google Fast Pair सपोर्ट तसेच IPX7 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स मिळते. ड्युअल पेअरिंग फीचर असलेला हा नेकबँड विशेष सवलतीनंतर ₹1,299 मध्ये खरेदी करता येतो.
Realme Buds Wireless 3
Realme च्या लाइटवेट नेकबँडमध्ये 13.4mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, तसेच यामध्ये 45ms लो-लेटन्सी मोड मिळतो. फुल चार्ज केल्यावर 32 तासांची बॅटरी लाइफ मिळते, तसेच हे डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स आहे. ₹2,499 च्या मूळ किमतीच्या ऐवजी Amazon वर हा नेकबँड फक्त ₹1,299 मध्ये उपलब्ध आहे.
JBL Tune 215BT
प्रीमियम ऑडिओ ब्रँड JBL च्या या नेकबँडमध्ये 12.5mm ड्रायव्हर्स तसेच ड्युअल पेअरिंग आणि व्हॉइस असिस्टन्स सपोर्ट मिळतो. हा नेकबँड फक्त 16 तासांचा प्लेटाइम देतो आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. ₹2,999 च्या मूळ किमतीच्या ऐवजी Amazon वर तो फक्त ₹1,499 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Noise Airwave
Noise चा हा नेकबँड विशेषतः तीन EQ मोड्स आणि गेमिंगसाठी लो-लेटन्सी मोड सह येतो. यामध्ये 10mm ड्रायव्हर्स आहेत आणि 50 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते. Amazon वर हा नेकबँड विशेष सवलतीनंतर फक्त ₹999 मध्ये खरेदी करता येतो.
Boult Audio Curve Max
Boult Audio चा हा नेकबँड दमदार बॅटरीसह येतो, जो फुल चार्ज केल्यावर 100 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देतो. यामध्ये 13mm ड्रायव्हर्स आणि इनवायरमेंटल नॉइस कॅन्सलेशन फीचर आहे. हा नेकबँड Amazon वर फक्त ₹999 मध्ये उपलब्ध आहे.