जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम कॅमेरा आणि शक्तिशाली परफॉर्मन्स असलेला फोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Flipkart वर विशेष डीलमध्ये Infinix Hot 40i बंपर सवलतीसह उपलब्ध आहे.
8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. बँक ऑफरचा वापर करून तुम्ही या फोनवर 1 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.
एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 8,850 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
Infinix च्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. एक्सटेंडेड रॅम फिचरमुळे या फोनची एकूण रॅम 16GB पर्यंत वाढते. चला तर, याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ.
Infinix Hot 40i चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix च्या या फोनमध्ये 720×1612 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.6-इंच डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याची पीक ब्राइटनेस 480 निट्स आहे. फोनमध्ये कंपनी 8GB रिअल रॅमसह 8GB व्हर्चुअल रॅमदेखील देते, ज्यामुळे या डिव्हाइसची एकूण रॅम 16GB पर्यंत वाढते. फोनची इंटरनल मेमरी 256GB आहे. हा फोन Unisoc T606 चिपसेटवर कार्य करतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या फोनला 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Android 13 बेस्ड XOS13 वर चालतो. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.