Jio vs Airtel: सध्या भारतात रिचार्ज प्लान्सच्या किमती वाढल्याने युजर्सना योग्य प्लान निवडताना बरीच विचार करावी लागत आहे. Jio आणि Airtel या दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्यांनी जुलै महिन्यात त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या किमतीत वाढ केली होती, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता युजर्स कमी खर्चात अधिक इंटरनेट डेटा आणि इतर फायदे देणारे प्लान्स निवडत आहेत. येथे आम्ही Jio आणि Airtel च्या अशा दोन प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात फक्त 1 रुपयाचा फरक आहे, परंतु फायद्यांमध्ये मोठा फरक आहे.
Jio चा Rs. 448 चा प्लान
Jio च्या Rs. 448 च्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा म्हणजेच एकूण 56GB डेटा मिळतो. त्याचबरोबर, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, आणि 12 ओटीटी अॅप्सचे (OTT Apps) सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते, ज्यात SonyLiv, Zee5, Jio Cinema Premium इत्यादी अॅप्स समाविष्ट आहेत. याशिवाय JioTV, Jio Cinema, आणि Jio Cloud सारख्या फीचर्सचा मोफत अॅक्सेस देखील उपलब्ध आहे.
Airtel चा Rs. 449 चा प्लान
Airtel च्या Rs. 449 च्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. Jio च्या प्लानच्या तुलनेत फक्त 1 रुपया जास्त किंमतीचा असलेल्या या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा म्हणजेच 28 दिवसांत एकूण 84GB डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 22 ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते, ज्यात SonyLiv, Sunnext, Hichoi इत्यादी अॅप्स समाविष्ट आहेत.
Jio आणि Airtel च्या प्लान्समध्ये फरक
Jio आणि Airtel च्या या प्लान्समध्ये बघायला गेल्यास, Airtel युजर्सना फक्त 1 रुपया अधिक देऊन दररोज 1GB एक्स्ट्रा डेटा मिळतो, ज्यामुळे एकूण 28 दिवसांत 28GB अतिरिक्त डेटा मिळतो. तसेच, Airtel आपल्या युजर्सना Jio च्या तुलनेत 10 अधिक ओटीटी अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देते, जे सध्या अधिक मागणीत आहे. या सर्व सुविधांमुळे Airtel चा रिचार्ज प्लान Jio च्या तुलनेत अधिक फायदेशीर आणि आकर्षक वाटतो.