सॅलरी अकाउंट (Salary Account) एक साधारण बँक अकाउंटप्रमाणेच आहे, ज्यामध्ये दर महिन्याला तुमचे एम्प्लॉयर तुमचा पगार जमा करतात. तुम्ही हा पगार उचलू शकता आणि व्यवहार करू शकता. पण, कधी विचार केला आहे का की तुमचा सॅलरी अकाउंट किती उपयुक्त आहे? तुम्हाला मिळणाऱ्या जबरदस्त ऑफर्स आणि फायद्यांची माहिती आहे का? जर नाही, तर काळजी करू नका. कारण अनेक वेळा बँक सॅलरी अकाउंट उघडताना हे फायदे सांगत नाही. क्लासिक सॅलरी अकाउंट, वेल्थ सॅलरी अकाउंट, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट-सॅलरी आणि डिफेन्स सॅलरी अकाउंटच्या सेवासुद्धा बँक देतात. पण याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.
इन्श्योरन्स कव्हरेजची सुविधा
काही सॅलरी अकाउंट्ससोबत अपघाती मृत्यू कव्हर किंवा आरोग्य विम्याचे कव्हर देखील मिळते. ही इन्श्योरन्स कव्हरेज एक अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.
कमी व्याजदरावर कर्ज
सॅलरी अकाउंटधारकांना वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्जावर कमी व्याजदर मिळतो. बँक कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज देऊ शकते.
ओव्हरड्राफ्टची सुविधा
सॅलरी अकाउंटमध्ये ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधा उपलब्ध असते, ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत अकाउंटमध्ये पैसे नसतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळते.
प्राधान्य सेवा
अनेक बँका सॅलरी अकाउंटधारकांना प्राधान्य सेवा (Priority Services) देतात, ज्यामध्ये फास्ट सर्विस, खास ग्राहक सेवा क्रमांक आणि विशेष ऑफर्सचा समावेश असतो.
क्रेडिट कार्ड ऑफर्स
काही बँका सॅलरी अकाउंटधारकांना मोफत क्रेडिट कार्ड आणि आकर्षक ऑफर्स देतात. यात वार्षिक शुल्क सवलत आणि रिवॉर्ड पॉइंट्स यांचा समावेश होतो.
ऑनलाइन शॉपिंग आणि डायनिंग ऑफर्स
सॅलरी अकाउंटधारकांना बँक विविध ऑनलाइन शॉपिंग आणि डायनिंग डील्स ऑफर करतात, ज्यामध्ये सवलत आणि कॅशबॅक यांचा समावेश असतो.
डिजिटल बँकिंगवर मोफत सेवा
सॅलरी अकाउंटमध्ये अनेकदा NEFT, RTGS यांसारख्या डिजिटल सेवा मोफत मिळतात, ज्यामुळे पैशांचा ट्रान्सफर सोपा आणि किफायतशीर बनतो.
फ्री चेकबुक आणि डेबिट कार्ड
सॅलरी अकाउंटवर बँक बहुतेक वेळा मोफत चेकबुक आणि डेबिट कार्डची सेवा देते. हे लहान खर्च वाचवून तुमच्यासाठी बचतीचे कारण बनू शकते.
फ्री ATM व्यवहार
सॅलरी अकाउंटमध्ये बँक साधारणपणे दर महिन्याला अनेक फ्री ATM व्यवहार उपलब्ध करून देते, ज्यामुळे तुम्हाला पैशांची आवश्यकता असताना कोणताही अतिरिक्त शुल्क न भरता कॅश काढता येते.
Zero Balanceची सुविधा
बहुतेक सॅलरी अकाउंटमध्ये Zero Balance ची सुविधा असते, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. ही सुविधा सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळत नाही.