टेक्नोने एक नवीन बजेट-फ्रेंडली टॅब्लेट Tecno Megapad 10 ग्लोबली लाँच केला आहे. मोठ्या स्क्रीनचा अनुभव देण्यासाठी या टॅब्लेटमध्ये आवश्यक ते सर्व फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
यात MediaTek Helio G80 चिपसेटसह 4GB RAM आणि 256GB पर्यंतचे ऑनबोर्ड स्टोरेज आहे. याशिवाय, 10.1 इंचाचा HD+ डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 18W वायर्ड चार्जिंग सपोर्टदेखील आहे. चला, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Tecno Megapad 10 Specification
Display
Tecno Megapad 10 मध्ये 10.1 इंचाचा LCD पॅनल आहे, ज्याचा रिझोल्यूशन 800×1280 पिक्सल्स आहे. टेक्नोने या डिस्प्लेमध्ये 450 nits ची कमाल ब्राइटनेस दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना उत्तम स्क्रीन अनुभव मिळणार आहे.
Processing
प्रोसेसिंगसाठी Tecno Megapad 10 टॅब्लेटमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे, जो एंट्री-लेव्हल चिप आहे. हे 4GB RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये मेमरी वाढवण्यासाठी microSD कार्ड स्लॉटची सुविधा देखील देण्यात आली आहे.
Battery & Charing
Tecno Megapad 10 एक मोठी बॅटरी असलेले डिव्हाइस आहे. यात 7,000mAh ची बॅटरी आहे, जी दीर्घकाळ वापरण्यायोग्य आहे. टेक्नोचा दावा आहे की 18W फास्ट-चार्जिंग सपोर्टमुळे हे डिव्हाइस सुमारे 2.5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
Camera
कॅमेराच्या बाबतीत, Tecno Megapad 10 मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिट आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Operating System
Tecno Megapad 10 टॅब्लेट Android 14 ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत आहे.
Other Features
नवीन टेक्नो टॅब्लेटमध्ये 4G LTE, सिम कार्ड स्लॉट + टी-फ्लॅश कार्ड स्लॉट, USB Type-C, ड्युअल स्पीकर्स, WiFi 2.4/5GHz, Bluetooth 5.1, तसेच Split Screen आणि ShapeFlex Snip यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
Tecno Megapad 10 Price & Color
अधिकृत लिस्टिंगनुसार, Tecno Megapad 10 दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: शॅम्पेन गोल्ड आणि स्पेस ग्रे. टॅब्लेटचे माप 240.7 x 159.5 x 7.35 मिमी आहे आणि वजन 447 ग्रॅम आहे. त्याच्या किंमती आणि उपलब्धतेची माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते.