Qualcomm Snapdragon 8 Elite Phones: शाओमीने फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Xiaomi 15 लाँच केली आहे. या अंतर्गत Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेटचा समावेश आहे. हे चिपसेट असलेले हे जगातील पहिले स्मार्टफोन आहेत. चला तर, त्यांच्या फीचर्स आणि किमतींबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Snapdragon 8 Elite एक अत्यंत पॉवरफुल मोबाइल प्रोसेसर आहे. यामध्ये हाय-स्पीड प्राइम आणि परफॉर्मन्स कोर, इमर्सिव ग्राफिक्ससाठी Adreno GPU, आणि Hexagon NPU सह AI क्षमता असे दमदार फीचर्स आहेत. हा चिपसेट स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. शाओमीच्या नवीन फोनमध्ये या चिपसेटचा फायदाही मिळणार आहे.
Xiaomi 15: Specification
Xiaomi 15 ला 20 विविध पॅनल ऑप्शन्ससह बाजारात आणले आहे. या फोनला दोन फ्रेम ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. यात डायमंड एडिशनदेखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.36 इंच 1.5K रिझॉल्यूशन OLED स्क्रीन आहे.
हा फोन 5400 mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह येतो. यात 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. यामध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Xiaomi 15 Pro: Specification
शाओमी 15 प्रोमध्ये 6.73 इंच 2K रिझॉल्यूशन क्वाड-कर्व्ड स्क्रीन आहे. या फोनमध्ये 6100 mAh बॅटरीची पॉवर आहे. चार्जिंगसाठी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यात देखील 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
Xiaomi 15 Pro Series: Price
शाओमी 15 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनी 2024 च्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीला या स्मार्टफोन सीरीजला ग्लोबल लेवलवर आणेल. Xiaomi 15 ची किंमत 4,499 चीनी युआन (अंदाजे 53,000 रुपये) पासून सुरू होते, तर Xiaomi 15 Pro ची किंमत 5,299 चीनी युआन (अंदाजे 62,420 रुपये) आहे.