Redmi लवकरच आपल्या Note 14 मालिकेत नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. गेल्या महिन्यात चीनमध्ये Redmi Note 14 Pro मालिकेचे अनावरण झाल्यानंतर, कंपनी Redmi Note 14 Pro 4G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Xiaomi चा हा स्मार्टफोन FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला असून, त्याचे मुख्य फीचर्स उघड झाले आहेत आणि त्याचा लवकरच लाँच होण्याचा संकेत मिळत आहे.
IMEI डेटाबेसवरही हा फोन नोंदला गेला आहे. FCC लिस्टिंगनुसार, डिव्हाइस लवकरच बाजारात येणार आहे. 91mobiles च्या रिपोर्टनुसार, याच्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च टाइमलाइनबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.
Redmi Note 14 Pro 4G चे प्रमुख फीचर्स:
FCC लिस्टिंगनुसार, Redmi Note 14 Pro 4G मध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच FHD+ pOLED डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले आकार Redmi Note 14 Pro 5G मालिकेसारखाच आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.
फोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB, आणि 12GB + 512GB अशा वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये येईल. 5500mAh क्षमतेची बॅटरी असली तरी चार्जिंग स्पीडबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
रिपोर्टनुसार, या फोनचे कोडनेम ‘Obsidian’ असेल आणि तो MediaTek Dimensity चिपसेटवर आधारित असेल. इतर फीचर्स लॉन्च दरम्यान उघड होतील.
Redmi Note 14 Pro 5G मालिकेचे फीचर्स:
Redmi Note 14 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर असेल, तर Pro+ व्हेरिएंट मध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट वापरण्यात आला आहे. हे मॉडेल्स 12GB आणि 16GB रॅम तसेच 128GB ते 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असतील.
Redmi Note 14 Pro कॅमेरा प्रेमींसाठी खास आहे. यात 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस दिला आहे. तर, Note 14 Pro+ मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा लाइट फ्यूजन आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह मिळतो. याशिवाय, यात 8MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 50MP पोर्ट्रेट टेलीफोटो कॅमेरा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरीच्या बाबतीत, Redmi Note 14 Pro मध्ये 5500mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सह येते. तर Note 14 Pro+ मध्ये 6200mAh बॅटरीसह 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.