पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana) अंतर्गत संपूर्ण भारतातील लाखो कुटुंबांना घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आहे. या योजनेत पात्र लाभार्थींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
मात्र, काही वेळा अपात्र व्यक्तीही या योजनेचा गैरफायदा घेतात. त्याशिवाय, काही लाभार्थी सरकारी अटींचे पालन करत नाहीत. जर असे झाले, तर सरकार तुमच्याकडून सबसिडी परत घेऊ शकते. म्हणूनच या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
1. (Credit Score) चांगला असणे गरजेचे
PM आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला घेतलेल्या (Home Loan) च्या नियमित हप्त्यांचा वेळेवर भरणा करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचा (Credit Score) उत्तम असावा. जर लाभार्थी कर्जाचे हप्ते वेळेवर भरत नसेल किंवा डिफॉल्टर ठरला, तर सरकार त्याला दिलेली सबसिडी रद्द करू शकते. त्यामुळे चांगला सिव्हिल स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे.
2. घर अपूर्ण ठेवू नका
लाभार्थ्यांनी घर बांधण्याचे काम सुरू केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक आहे. जर घराचे बांधकाम अर्धवट सोडले, तर सरकार सबसिडी परत घेऊ शकते. याचा उद्देश असा आहे की, फक्त पात्र व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळावा आणि ते घर बांधून वास्तव्यासाठी वापरावे.
3. घर भाड्याने देऊ नका
पंतप्रधान आवास योजनेचा हेतू म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे. जर कोणी लाभार्थी सबसिडी घेऊन घर घेतले आणि स्वतः त्या घरात न राहता ते भाड्याने दिले, तर सरकारला त्याचा गैरवापर वाटू शकतो. अशा प्रकरणांमध्ये सबसिडी रद्द होण्याची शक्यता असते. म्हणून, लाभार्थीने स्वतःच त्या घरात राहणे आणि त्याचा वैयक्तिक वापर करणे बंधनकारक आहे.