Nothing चा नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a Plus भारतात अलीकडेच लॉन्च झाला आहे. जर तुम्ही या फोनला कमी किमतीत घेण्याची वाट पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
कारण फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये या फोनवर 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये हा फोन कमी किमतीत विकला जाईल. या ऑफरमध्ये मिळणाऱ्या डिस्काउंट आणि ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया:
Nothing Phone 2a Plus वर डिस्काउंट आणि ऑफर्स
Nothing Phone 2a Plus वर बिग बिलियन डेज सेलमध्ये 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. फोनवर 2000 रुपयांची थेट सूट आणि 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे फोनची किंमत 23,999 रुपये होईल. तसेच, Nothing Phone 2a फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये 18,999 रुपयांत उपलब्ध होईल.
Nothing Phone 2a Plus चे खास फीचर्स
Nothing Phone 2a Plus मध्ये 6.7 इंचाची फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. यात ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7350 Pro 5G प्रोसेसर आणि Mali-G610 MC4 GPU आहे.
कॅमेरा सेटअपमध्ये फोनच्या रियरला 10x डिजिटल झूम, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (EIS), ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फ्रंटला 50 मेगापिक्सलचा सॅमसंग JN1 सेल्फी कॅमेरा आहे.
कंपनीच्या या नवीन फोनसाठी 3 वर्षांचे Android अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅच मिळतात. यामध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये 20GB पर्यंतची एक्स्पेंडेबल रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.
Nothing च्या या फोनमध्ये 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे. Phone 2a Plus ला IP54-रेटिंग आहे, ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळते.