LGP Cylinder: सरकारकडून वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. गरिबी रेषेखालील लोकांसाठी काही योजना अत्यंत उपयुक्त ठरतात. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने अशा योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत गणेश चतुर्थीपूर्वी सरकारने गृहिणींना फक्त 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.
सवलतीत एलपीजी सिलिंडर कसा मिळवावा?
गृहिणींना सवलतीत एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी एक विशेष योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हरियाणाचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. हरियाणा सरकारने 46 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांना फक्त 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर मिळू शकेल.
सवलतीत सिलिंडर कसा बुक करायचा?
सरकारने गृहिणींसाठी एक खास गृहिणी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे आता ग्राहक घरबसल्या सवलतीत एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. त्यासाठी तुम्हाला https://epds.haryanafood.gov.in या लिंकवर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल. एकदा फॉर्म भरून नोंदणी झाल्यावर, तुम्ही सवलतीत सिलिंडर घेण्यास पात्र ठराल.
अंत्योदय योजनेतही मिळतो सवलतीत सिलिंडर
या योजनेशिवाय, सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत देखील सवलतीत सिलिंडर दिले जातात. या योजनेत एका वर्षात कुटुंबाला 12 सिलिंडर दिले जातात. जेव्हा कुटुंबाने सिलिंडर घेतला जातो, तेव्हा त्याची संपूर्ण रक्कम सरकारकडून त्यांच्या खात्यात जमा केली जाते, म्हणजेच 12 सिलिंडर पूर्णपणे मोफत मिळतात. या योजनेत सहभागी लाभार्थ्यांना मोबाइल किंवा मेसेजद्वारे याबाबत माहिती मिळते.