health

त्वचा गोरी करण्यासाठीच्या या क्रीमचे काळे सत्य वाचून तुमचे डोळे उघडतील, 99% लोकांना माहीत नाही हे सत्य

हल्ली प्रत्येकाला आपण गोरे असावे असे वाटते. तरुण पिढी एक दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी आणि सर्वात सुंदर आणि गोरे दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते अनेक प्रकारच्या फेयरनेस क्रीम, ऑइंटमेंट, इंजेक्शन इत्यादी वापरतात. तसे पाहता गोरी त्वचा ही काही सौंदर्याचे प्रतीक नाही पण आपल्या मानसिकतेवर असलेला पाश्चामात्य लोकांचा पगडा गोरी त्वचा म्हणजे सुंदरता मानण्यास भाग पाडतो. गोरी त्वचा मिळवण्यासाठी मार्केट मध्ये अनेक प्रकारच्या क्रीम उपलब्ध आहेत. त्यामधील काही क्रीम स्वस्त आहेत तर काही महाग आहेत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की बहुतेक ब्रांडेड क्रीममुळे फायद्या पेक्षा जास्त नुकसान होते. टिव्ही आणि वर्तमानपत्रात अनेक क्रीमच्या जाहिराती दिसतात. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की प्रत्येक जाहिरात आपल्या प्रोडक्टला वाढवूनचढवून दाखवते आणि नुकासानांच्या बद्दल काही माहीती देत नाहीत.

पण आज आम्ही या आर्टिकल मध्ये अश्या एका क्रीम बद्दल सांगत आहोत ज्याचे सत्य तुमचे डोळे उघडतील. कदाचित या क्रीमचा वापर तुमच्या परिवार किंवा फ्रेंड्स पैकी कोणी ना कोणी करत असेलच. पण या क्रीमच्या सत्याची माहीती तुम्हाला देखील नसेल.

ही आहे गोरी त्वचा देणारी क्रीम

बाजारात आयुर्वेदिक आणि केमिकल अश्या दोन्ही प्रकाराने बनलेल्या क्रीम सहज उपलब्ध आहेत. पण आज या क्रीमच्या सत्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. या क्रीमचे नाव बेटनोवेट एन (Betnovate – N) आहे. ही बाजारात सहज उपलब्ध आहे. लोक आपल्या त्वचेला गोरी करण्यासाठी या क्रीमचा वापर सर्वाधिक करतात. पण या क्रीमच्या मागील सत्य कोणाला माहीत नाही आहे. दिसण्यास ही क्रीम इतर क्रीम प्रमाणे दिसते. पण बोलतात ना “प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते”. त्याच प्रमाणे प्रत्येक सफेद दिसणारी क्रीम उपयोगी नसते.

हे आहे या क्रीमचे सत्य

खरेतर, बेटनोवेट एन नावाच्या या क्रीम मध्ये स्टेरॉयड आहेत, हे स्टेरॉयड काही सामान्य स्टेरॉयड नाहीत तर सर्वात ताकतवान आणि असरदायक bethamethasone आहे. पण क्रीम चेहऱ्यावर लावल्यावर आपल्याला काही दिवसातच एक वेगळाच निखार आणि चमक मिळते. लोकांना वाटते क्रीम आपल्या चेहऱ्यासाठी सर्वोत्तम आहे. पण लोकांना हे माहीत नसते की bethamethasone एक असे स्टेरॉयड आहे जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवेल पण जर तुम्ही या क्रीमचा वापर करणे बंद केले तर स्टेरॉयड आपला परिणाम तुमच्या स्कीन वर सोडतो आणि त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट करतो.

या क्रीममुळे जर तुमचा चेहरा खराब झाला तर त्या चेहऱ्याला परत ठीक करणे कोणत्याही क्रीमच्या बसची गोष्ट राहत नाही. यासाठी जर तुम्ही पण या क्रीमचा वापर करत असाल तर आजच वापर बंद करा. अन्यथा एक छोटीसी चूक तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागेल.


Show More

Related Articles

Back to top button