Breaking News

अरे हे काय लग्न मोडण्यास कारण चक्क आधार कार्ड ठरलं, असे काय कारण होते आधार कार्ड मध्ये

आधार कार्ड अनेक सरकारी कामासाठी उपयोगी आहे. त्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही नुकसान देखील आहेत. आज आपण त्याच्या फायद्या बद्दल नाही तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानी बद्दल जाणून घेऊ.

आज पर्यंत तुम्ही आधार कार्ड बद्दलची अनेक प्रकरणे ऐकली असतील. पण आज जी घटना आपण जाणून घेणार आहोत ती समजल्यावर तुम्हाला असे काही घडू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

या घटनेमध्ये आधार कार्डमुळे लग्न मोडलं आहे. होय लग्न मोडण्याचं कारण आधार कार्ड देखील असू शकत याचा विचार तुम्ही केला नसेलच. पण असं आधार कार्ड मिसमैच झाल्यामुळे लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.

या घटने नंतर वधू रडायला लागली आणि तिच्या कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी पोलिसात संपर्क केला. आधार कार्ड मिसमैच झाल्यामुळे वधू-वर पक्षा मध्ये वाद झाला होता.

हे प्रकरण आंध्र प्रदेश मधील गुंतूर चे आहे. मुलाच्या बाजूच्या लोकांनी मुलीच्या वडिलांचे आधार कार्ड पाहिले पण त्यांच्या आधार कार्ड मध्ये सरनेम मध्ये ‘रेड्डी’ नव्हतं. ज्यामुळे दोन्ही कुटुंबा मध्ये वाद झाला आणि लग्न मोडलं.

नवरी रडायला लागली ज्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन न्याय मागितला.

खरतर दोन्ही कुटुंबाने लग्नाची जोरदार तयारी केली होती. पण आधार कार्ड मिसमैच झाल्याने शेवटच्या क्षणी लग्न मोडलं. तक्रार दाखल झाल्या नंतर पोलीस अधिक तपास करत आहेत. तर वधू कुटुंबीय वर पक्षाच्या या निर्णयाला अतिशय चुकीचे सांगत आहेत.