Connect with us

वाढदिवस विशेष : 10 फेब्रुवारी रोजी जन्म घेतलेल्या व्यक्तींसाठी कसे राहील वर्ष

Astrology

वाढदिवस विशेष : 10 फेब्रुवारी रोजी जन्म घेतलेल्या व्यक्तींसाठी कसे राहील वर्ष

मूलांक व्यक्तीच्या जन्म तारखेची बेरीज असते म्हणजे तुमचा जन्म 1 ते 9 तारखे दरम्यान झाला असेल तर जी तारीख आहे तोच तुमचा मूलांक आहे तर जन्म 10 ते 31 तारखे दरम्यान झालेला असेल तर या तारखेची बेरीज तुमचा मूलांक होईल.

जसे कि तुमचा जन्म जर 24 तारखेला झालेला असेल तर 2 + 4 = 6 म्हणजेच 6 हा तुमचा मूलांक असेल.

चला पाहू 10 फेब्रुवारीला जन्म झालेल्या व्यक्ती बद्दल अधिक माहिती.

स्वभाव 

या मूलांकाने प्रभावित व्यक्ती अत्यंत आत्मविश्वास, शांत तसेच गंभीर स्वभावाची असते.

लक्ष्य प्राप्तीसाठी हे लोक कठीण परिश्रम करतात आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यात यशस्वी होतात.

अशक्य ते शक्य करण्यात यांना आनंद येतो. यांची इच्छा शक्ती प्रबळ असते.

सामान्य घरात जन्म घेऊन देखील हे लोक समाजात सन्मानीय स्थान प्राप्त करण्यात यशस्वी होतात.

या वर्षी मिळणारे यश 

मागील वर्षा पासून सुरु असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. विकास कार्यात यशस्वी झाल्याने मन प्रसन्न राहील.

आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. समाजात मान वाढेल. कुटुंबात सुख शांती राहील. जागा जमिनीची कामे मार्गी लागतील.

मानसिक आणि शारीरिक दृष्टीने तुम्ही मजबूत राहाल. अभ्यासात परिश्रम घेतल्याने रोजगार देणाऱ्या परीक्षांमध्ये यश तसेच इंजिनियरिंग, रेल्वे, वकिली, विमा, बैंक, सीए इत्यादी करियर मध्ये संधी प्राप्त होईल.

व्यावसायिक दृष्टीने वर्ष लाभदायक राहील. शिक्षण, वस्त्र, किराणा, चिकित्सा उपकरण इत्यादी व्यवसायात उत्तम धन लाभ होईल.

यावर्षी नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता. सरकारी क्षेत्रा काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा ट्रांसफरचा लाभ मिळू शकतो.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Advertisement
To Top