Money Plant Upay: अनेक घरांमध्ये तुम्ही मनी प्लांटचं रोप (Money Plant Upay) पाहिलं असेल. काही लोकं घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी तर काही लोकं धन आणि प्रगतीसाठी हे रोप लावतात. अशी मान्यता आहे की घरात मनी प्लांट (Money Plant ke Totke) लावल्याने भरपूर प्रगती होते. सनातन धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट झाडं- रोपं लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात आणि माणसाच्या सौभाग्याचे मार्ग उघडतात. यापैकीच एक आहे मनी प्लांटचं रोप.
वास्तुशास्त्रात मनी प्लांटच्या रोपासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. असं म्हटलं जातं की मनी प्लांट चुकीच्या दिशेला लावल्याने त्याचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. तर मग आज आपण इथे मनी प्लांटशी संबंधित काही उपायांबद्दल जाणून घेऊया:-
दिशेची विशेष काळजी घ्या
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला लावावा, असं केल्याने घरात बरकत येते आणि तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतात. ते घराबाहेर न लावता आतच लावावं. यामुळे रोपाची वाढ टिकून राहील.
मनी प्लांटमध्ये बांधा हा लाल कपडा
असं म्हटलं जातं की घराची प्रगती टिकवण्यासाठी दर शुक्रवारी मनी प्लांटच्या रोपाला पाण्यात कच्चं दूध मिसळून अर्पण करा. यामुळे तुमच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही. याव्यतिरिक्त मनी प्लांटच्या मुळांजवळ लाल रंगाची फीत बांधा. यामुळे तुमच्या जीवनात चालणाऱ्या धनसंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.
दुसऱ्यांना मनी प्लांट देऊ नये
मनी प्लांटचं रोप नेहमी स्वतः खरेदी करूनच घरात लावावं. हे रोप कधीही दुसऱ्यांकडून मागून लावू नये. त्याचबरोबर आपल्या घराच्या मनी प्लांटचं रोप दुसऱ्यांच्या अंगणात किंवा बागेत उगवण्यासाठी देऊ नये. असं केल्याने घराची बरकत जाते.