शिष्याने आपल्या गुरूला विचारले यश मिळवण्याचा मार्ग सांगा, गुरु म्हणाले अगोदर माझी बकरी बांध

एका शिष्याने आपल्या गुरुला सांगितले कि मला यशस्वी बनायचे आहे, गुरुजी मला यशस्वी होण्याचा मार्ग सांगा. गुरु आपल्या शिष्याला म्हणाले ठीक आहे मी तुला यशस्वी होण्याचा मार्ग सांगेल, पण पहिले तू माझ्या बकरीला खुंटीला बांध. असे म्हणत गुरु ने बकरी सोडली आणि रस्सी शिष्याच्या हातात दिली.

ती बकरी आपल्या मालकाच्या शिवाय इतर कोणाच्याही ताब्यात राहत नसे. रस्सी शिष्याने पकडताच बकरी उड्या मारू लागली. अनेक प्रयत्न करून देखील शिष्य बकरीला खुंटीला बांधू शकला नाही.

तेव्हा शिष्याने चतुराई दाखवली, पहिले त्याने बकरीला पकडले आणि तिचे पाय रस्सीने बांधले. त्यानंतर आरामात त्याने बकरी खुंटीला बांधली. हे पाहून त्याचे गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी शिष्याला सांगितले कि तू आपल्या बुद्धीचा चांगला वापर केला आहे. जर आपण याच प्रमाणे कोणत्याही समस्यांच्या मुळाला पकडले तर ती समस्याच सहज दूर करता येते आणि आपण यशस्वी होतो. हेच यशाचा मूलमंत्र आहे.

या कथेतून आपल्याला शिकण्यास मिळते कि आपण समस्या आल्या नंतर चतुरतेने सामना केला पाहिजे. अगोदर समस्यांच्या मुळाशी गेले पाहिजे म्हणजेच समस्येचे कारण शोधले पाहिजे आणि त्यानंतर त्यास दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास मोठया समस्यां देखील सहज दूर होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here