बॉलिवूडची ही अभिनेत्री दोन मुलांची आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात करणार पुनरागमन

काही हिंदी चित्रपटामध्ये दिसलेली आणि साऊथच्या चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री आणि दीर्घ काळ रुपेरी पडद्या पासून दूर राहणारी तसेच मस्ती, तुझे मेरी कसम, जाने तू या जाने ना यासारख्या चित्रपटात काम केल्या नंतर संसारात व्यस्त झाल्याने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतलेली अभिनेत्री जेनेलिया डिसूजा पुन्हा चित्रपटामध्ये पुनरागमन करणार आहे.

नजदीकच्या काळात जेनेलिया ने चित्रपटा मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून जरी काम केले नसले तरी लय भारी, जय हो, फोर्स 2 या सारख्या चित्रपटा मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. परंतु फैन्स जेनेलियाला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत पण प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि लवकरच एका चित्रपटात ती काम करणार असल्याची चर्चा आहे.

जेनेलियाचा काळ वाढदिवस होता त्या प्रसंगी रितेश देशमुख यांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेयर केल्या. रितेश आपल्या ट्विट मध्ये लिहितो, “तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण तुमची लाईफ पार्टनर होते त्यावेळी तुमचे आयुष्य खूपच चांगले होते. माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा… तू एक खूप चांगली आई असून संपूर्ण कुटुंबाला तू एकत्र बांधून ठेवतेस… पुढील जन्मातही मीच तुझा नवरा बनो… ही देवाकडे नक्कीच प्रार्थना करेन…”

रितेशने काल इन्स्टाग्रामवर जेनेलिया आणि राम पोथिनेनी या दाक्षिणात्य अभिनेत्याचा फोटोपोस्ट करत त्याने लिहिले आहे की, रेडी 2 साठी तयार…

अजून एका फोटोमध्ये राम, जेनेलिया आणि रितेश यांना आपल्याला एकत्र दिसत असून आमची संध्याकाळ खास केल्याबद्दल धन्यवाद असे रितेशने रामला म्हटले आहे.

2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेडी चित्रपटा मध्ये राम आणि जेनेलिया एकत्र दिसले होते आता पाहायचे हे आहे कि खरंच राम आणि जेनेलिया पुन्हा रेडी 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच आपल्याला समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here